IAS Govind Jaiswal Saam Tv
बिझनेस

IAS Govind Jaiswal: शेजार्‍यांच्या टोमण्यामुळे जिद्दीला पेटला, IAS होऊन वडि‍लांच्या अपमानाचा घेतला बदला, गोविंद यांची सक्सेस स्टोरी

IAS Govind Jaiswal Success Story: प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही अडचणी असतात. परंतु त्या अडचणींवर मात करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो. त्याला आयुष्यात यश मिळते.असंच यश गोविंद जयसवाल यांनाही मिळालं.

Siddhi Hande

आयुष्यात इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती खूप यशस्वी होऊ शकतो. असंच यश प्रत्येक आयएएस ऑफिसर यांनी मिळवलं आहे. यूपीएससी ही सर्वात कठीण आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न गोविंद जयस्वाल यांनी मिळवलं आहे. गोविंद यांचे वडील रिक्षा चालवायचे. वडील रिक्षा चालवतात म्हणून गोविंद यांचे मित्र त्यांचा खूप अपमान करायचे, परंतु याच अपमानाला उत्तर आपल्या कामातून द्यायचं असं गोविंद यांनी ठरवलं आणि स्पर्धा परिक्षेची तयारी केली. (IAS Officer)

गोविंद जयसवाल यांचा जन्म बनारस येथे झाला. त्यांचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले. त्यांनी पुढे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. गोविंद यांचे वडिल रिक्षा चालवायचे. रिक्षा चालवून ते कुटुंबियांचे पालन पोषण करायचे. गोविंद हे लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी आईच्या उपचारासाठी आयुष्यभराची पुंजी लावली होती. आई गेल्यानंतर गोविंद आणि त्यांच्या बहि‍णींनी खूप खडतर परिस्थितीत जीवन काढले.

लहानपणी गोविंद आपल्या मित्राकडे खेळायला गेला होता. गोविंद यांचे वडिल रिक्षा चालवतात हे कळल्यानंतर त्यांच्या मित्राने त्यांचा अपमान केला. गोविंद यांच्याशी खेळण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या शिक्षकांना विचारले की, माझे मित्र माझ्यासोबत असं का वागतात. मी असं काय करु की ते माझा सन्मान करतील. त्यावेळी त्यांच्या शिक्षिकेने सांगितले की, तू बिझनेसमॅन किंवा आयएएस अधिकारी हो. त्याचवेळी गोविंद यांनी आयएएस होण्याचा निर्धार केला. (IAS Govind Jaiswal Success Story)

यूपीएससी (UPSC) परिक्षेची तयारी करण्यासाठी गोविंद हे दिल्लीला गेले होते. त्यांच्या वडिल त्यांना खर्चासाठी काही पैसे पाठवयाचे. त्यांचे वडिल आजारी असतानाही खूप मेहनत करायचे आणि पैसे पाठवयाचे. त्यामुळेच त्यांनी स्वतः ट्यूशन घ्यायचे ठरवले. जेणेकरुन थोडे पैसे मिळतील.

गोविंद यांनी २००७ साली पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पा, केली. त्यांनी ४८ रँक मिळवत यश मिळवले. त्यांच्या आयुष्यावर अब दिल्ली दूर नही है या नावाचा चित्रपटदेखील बनवला गेला. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. (IAS Officer Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT