Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईपण भारी देवा! शिक्षक झाल्या, ८ महिन्याच्या मुलाला सांभाळत केली UPSCची तयारी; IAS मोनिका रानी यांचा प्रवास

Success Story Of IAS Monika Rani: आयएएस मोनिका रानी या निर्भीड आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.त्यांनी लग्नानंतर काम आणि मूलाचा सांभाळ करत यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

IAS मोनिका राणी यांचा प्रेरणादायी प्रवास

लग्नानंतर क्रॅक केली UPSC

बाळ ८ महिन्यांचे असताना सुरु केली तयारी

२०१० मध्ये यूपीएससी परीक्षेत मिळवली ७०वी रँक

शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे जी सर्वकाही बदलू शकते. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी कोणतेही वय नसते. अभ्यास केल्याने बुद्धीला चालना मिळते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तरच तुम्हाला यश मिळते. असंच काहीसं आयएएस मोनिका रानी यांनी केलं. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली.

मोनिका रानी यांचा प्रवास

मोनिका रानी या मूळच्या गुरुग्रामच्या रहिवासी. त्यांचा जन्म १९८२ रोजी झाला. त्यांनी सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बीकॉमचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर वयाच्या २३व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. एमए पूर्ण केल्यानंतर त्या दिल्ली सरकारी शाळेत शिक्षक झाल्या. त्यांच्या पतीची पोस्टिंग कोलकत्ता येथे झाली होती.

मोनिका रानी यांनी लहानपणापासूनच प्रशासकीय अधिकारी व्हायचे होते. लग्न झाले, त्यानंतर मुलदेखील झाले. तरीही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. मोनिका रानी यांनी त्यांचा मुलगा ८ महिन्याचा असताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली. घरातील सर्व कामे करुन त्यांनी अभ्यास केला. याचसोबत त्या शाळेत शिकवण्यासाठीही जायच्या.

घर, काम सांभाळत त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.रात्री त्यांना जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा त्या अभ्यास करायच्या. २०१० मध्ये मोनिका यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ७०वीरँक प्राप्त केली.यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल 10 मिनिटे विलंबाने सुरु

Calcium Deficiency: कॅल्शियमची कमतरता असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणं

Chinch Gulachi Amti Recipe: आंबट- गोड चिंच, गुळाची आमटी कशी बनवण्याची? सोपी रेसिपी जाणून घ्या

Shanaya Kapoor: शिमर ड्रेसमध्ये शनाया कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

Army Jeep Accident: लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; वळणावरून जाताना जीप उलटली, मेजरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT