Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शाळा, कॉलेजमध्ये फेल, दोनदा केली UPSC पास; IAS अनुराग कुमार यांचा प्रवास

Success Story of IAS Kumar Anurag: आयएएस अनुराम कुमार यांनी सलग दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे. ते कॉलेजमध्ये असताना नापास झाले होते तरीही त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

IAS कुमार अनुराग यांचा प्रेरणादायी प्रवास

दोनदा यूपीएससी परीक्षा पास

कॉलेजमध्ये झाले होते फेल

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत आयएएस कुमार अनुराग यांनी केली. ते शाळेत असताना परीक्षेत नापास झाले होते. तरीही त्यांनी मेहनत केली आणि परीक्षा पास केली.

कॉलेजच्या परीक्षेतदेखील ते फेल झाले होते. परंतु त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ते शाळेत असताना प्री बोर्डाच्या परीक्षेत गणितात नापास झाले होते. परंतु त्यांना फायनलमध्ये ९० टक्के गुण मिळाले होते. ते पुन्हा कॉलेजमध्येही नापास झाले होते.

आयएएस कुमार अनुराग हे मुळचे बिहारच्या कटिहारचे रहिवासी आहेत. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण हिंदीतून केले. यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमात अॅडमिशन घेतले. त्यावेळी त्यांना अडचण आली. ते १२वीत गणितात फेल झाले होते. यानंतर त्यांनी मेहनतीने १२वीच्या फायनल परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवले आहेत.

कुमार अनुराग यांना प्रवेश परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने त्यांचे आयआयटीमध्ये अॅडमिशन घेण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यांनी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी ग्रॅज्युएशन केले त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

अनुराग यांनी २०१७ मध्ये पहिल्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक ६६७ प्राप्त केली. यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. २०१८ मध्ये त्यांनी ४८ रँक प्राप्त केली. त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT