Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांचे छत्र हरपलं, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक; IAS दिव्या तंवर यांचा प्रवास

Success Story Of IAS Divya Tanwar: आयएएस दिव्या तंवर यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. दिव्या तंवर यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

IAS दिव्या तंवर यांचा प्रेरणादायी प्रवास

पहिल्या प्रयत्नात IPS अधिकारी

दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी झाल्या

केंद्रीय लोकसेवा आयोग ही परीक्षा सर्वात अवघड असते. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस आणि आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दरम्यान, यासाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. जर तु्म्ही मेहनत घेतली तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच काहीसं दिव्या तंवर यांनी केलं. एकदा नाही तर दोनदा त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. पहिल्यांदा यूपीएससी (UPSC) परीक्षा पास करुन त्या आयपीएस अधिकारी बनल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्या आयएएस अधिकारी बनल्या.

दिव्या तंवर या मूळच्या हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यातील निंबी गावच्या रहिवासी. २०११ मध्ये दिव्याच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर आर्थिक संकंट ओढावले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर आली. त्यांच्या आईने शेतात मजुरी केली. वेळप्रसंगी त्यांनी शिलाईचेदेखील काम केले. कठीण परिस्थिती असतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही.

दिव्या यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून घेतले. त्यानंतर त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय येथे अॅडमिशन घेतले. त्यांनी आपली मेहनत सुरु ठेवली. यानंतर त्यांनी सायन्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी

यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी अनेकजण कोचिंग क्लासेस लावतात. परंतु दिव्या यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यांनी ऑनलाइन क्लास, टेस्ट सीरीज आणि मॉक टेस्टद्वारे अभ्यास केला. त्यांनी कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावले नाही. त्यांची शिस्त आणि अभ्यास करण्याची पद्धत यामुळे त्यांना यश मिळाले.

२१व्या वर्षी बनवल्या IPS

दिव्या तंवर यांनी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी ऑल इंडिया रँक ४३८ प्राप्त केली. २१ व्या वर्षी आयपीएस अधिकारी होणाऱ्या सर्वात अधिकाऱ्यांपैकी एक आहे.

दुसऱ्या प्रयत्नात IAS

दिव्या तंवर यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी २०२२ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश मिळाले. त्यांनी १०५ रँक प्राप्त केली. दुसऱ्या प्रयत्नात दिव्या तंवर या आयएएस अधिकारी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weak Relationship: नवरा- बायकोमधील या ६ चुकांमुळे नात्याचा होतो शेवट

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Dilip Prabhavalkar: 'कलाकार झालो, पण बाबा नव्हते...'; अभिनय करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या वडीलांच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भावुक

हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

Raj Thackeray Setback : राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT