Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: तीन वेळा अपयश आलं तरी जिद्द सोडली नाही; IAS झाली; अवधिजा गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Advija Gupta: अवधिजा गुप्ता या यूपीएससी टॉपर आहेत. अवधिजा गुप्ता यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले त्यामुळे त्यांना यश मिळाले.

Siddhi Hande

IAS अवधिजा गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास

सलग तीन प्रयत्नात अपयश

हार मानली नाही, चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली यूपीएससी

देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु अपयशामुळे कधीच हार मानायची नाही. तुम्ही जर अभ्यासात सातत्य ठेवले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. असंच यश अवधिजा गुप्ता यांना मिळालं.

अवधिजा गुप्ता यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. अवधिजा गुप्ता या मूळच्या महाराष्ट्राच्या रहिवासी. त्यांचे बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. अनेकदा त्यांना वडिलांच्या बदलीमुळे शहरे बदलावी लागली. त्यांनी १०वीचे शिक्षण राजस्थान तर १२वीचे शिक्षण कोलकत्ता येथून घेतले. त्या फार आधीपासूनच हुशार होत्या. २०२० मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

अवधिजा यांचा चौथ्या प्रयत्नात यश

अवधिजा यांना तीन वेळा अपयश आले तरीही त्यांना हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेवटी चौथ्या प्रयत्नानत यश मिळवले.

मेहनत आणि संयमामुळे अवधिजा यांना हे यश मिळाले. यूपीएससी २०२४ मध्ये ४३ रँक प्राप्क केली. त्यांची आयएएस पदावर निवड केली. त्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. यामुळे त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी बळ मिळाले. त्यामुळे तुमच्या प्रवासात कितीही अडचणी आल्या तरीही हार मानायची नाही.

अवधिजा यांना २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये यूपीएससी प्रिलियम्समध्ये अपयश मिळाले.त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू पास केला. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय हे यश मिळवले. त्यांचा हा प्रास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT