Hyundai Grand i10 Nios 2024 Saam Tv
बिझनेस

स्पोर्टी लूक, पॉवरफुल्ल इंजिन; नवीन Hyundai Grand i10 Nios CNG भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत

Satish Kengar

आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai ने आता ड्युअल सिलेंडर असलेली आपली हॅचबॅक कार Grand i10 भारतात लॉन्च केली आहे. याआधी कंपनीने Duo CNG सिलिंडर तंत्रज्ञानासह एक्स्टर लॉन्च केली होती.

टाटा मोटर्सने ही कॉन्सेप्ट आपल्या कारमध्ये समाविष्ट केली होती, जी ग्राहकांना आवडली होती. कारण बूटमधील जागेची समस्या दूर झाली होती. म्हणजे आता तुम्ही गाडीत जास्त सामान ठेवू शकता. यातच नवीन Grand i10 Duo CNG ची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

या कारमध्ये 1.2L Bi-Fuel (पेट्रोल + CNG) इंजिन आहे. जे 69PS चा पॉवर आणि 95.2Nm टॉर्क जनरेट करते. यात 60 लिटरची इंधन टाकी आहे. या कारमध्ये देण्यात आलेले इंजिन पॉवरफुल्ल तर आहेच शिवाय प्रत्येक सीझनमध्ये चांगली परफॉर्मन्स देईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

किती आहे किंमत?

Hyundai Grand i10 Nios CNG दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. याच्या मॅग्ना व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7,75,300 रुपये आहे आणि Sportz व्हेरिएंटची किंमत 8,30,000 रुपये आहे.

कारमध्ये बॅक पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबलिटी कंट्रोल, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर एसी व्हेंट, टिल्ट स्टीयरिंग यासह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT