Hyundai Creta N Line launched in India Saam Tv
बिझनेस

Hyundai Creta N Line: प्रतीक्षा संपली! स्पोर्टी लूकमध्ये नवीन क्रेटा लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत

Hyundai Creta N Line launched: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Hyundai India ने आपली नवीन Hyundai Creta N Line भारतात लॉन्च केली आहे. हा

Satish Kengar

Hyundai Creta N Line launched in India:

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Hyundai India ने आपली नवीन Hyundai Creta N Line भारतात लॉन्च केली आहे. हा Hyundai Creta चा अपडेटेड व्हॅरिएंट आहे. जबरदस्त स्पोर्टी लूक असणारी या कारची ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते.

ही नवीन कार ग्राहकांना सहा रंग पर्यायात मिळेल. यात स्टँडर्ड 17-इंचाऐवजी 18-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तसेच मागील बाजूस ड्युअल-टिप एक्झॉस्टसह वेगळा बंपर देखील उपलब्ध आहे. क्रेटा एन लाइनच्या दोन्ही बाजूला लाल पट्टी देण्यात आली आहे, जी याच्या स्पोर्टी लूकमध्ये भर घालते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या नवीन कारच्या केबिनबद्दल बोलायचे झाले तर, ही ऑल-ब्लॅक इंटीरियरने सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त याला एक स्पोर्टियर स्टीयरिंग व्हील आणि गियर सिलेक्टर मिळतो, जो स्टँडर्ड क्रेटामध्ये पाहायला मिळत नाही. कारच्या केबिनमध्ये ग्राहकांना एअर फ्रंट सीट्स, इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ड्युअल 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ADAS तंत्रज्ञान, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर ड्रायव्हर सीट, ड्युअल-झोन क्लायमेट मिळेल. कंट्रोल आणि 70 हून अधिक कार कनेक्टेड फीचर्स मिळतात.  (Latest Marathi News)

क्रेटा एन लाइनमध्ये स्पोर्टियर सस्पेंशन सेटअप आणि वजनदार स्टीयरिंग देण्यात आले आहे. आपण याच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर त्यात फक्त एक 1.5 लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन आहे. जे 160bhp पॉवर आणि 253Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

किती आहे किंमत

नवीन क्रेटा एन लाइन 8.9 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग गाठण्याचा दावा करते. कारचा N8 MT बेस व्हेरिएंट 16.82 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT