Hyundai Creta EV 2024 Saam Tv
बिझनेस

Upcmong EV: मुंबई ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार! Hyundai Creta EV सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च? किती असेल किंमत?

Hyundai Creta EV 2024: Hyundai Creta EV या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनी लॉन्च करू शकते. ही कार एका चार्जमध्ये मुंबई ते कोल्हापूर गाठू शकते.

Satish Kengar

ह्युंदाई मोटर इंडियाने अलीकडेच त्यांची नवीन क्रेटा आणि क्रेटा एन लाइन भारतात लॉन्च केली आहे. लॉन्च होताच या एसयूव्हीची बाजारात मोठी मागणी होताना दिसत आहे. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. आता अशी बातमी समोर येत की, या वर्षी सप्टेंबरमध्ये Creta चा इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केला जाऊ शकतो. सूत्रानुसार, टेस्टदरम्यान ही कार अनेकदा दिसली आहे.

किती देणार रेंज?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai Creta Electric मध्ये 45kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो. जो पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 450 किमीची रेंज देऊ शकतो. नवीन इलेक्ट्रिक क्रेटा 138hp पॉवर आणि 255 Nm टॉर्क जनरेट करेल. रेंजच्या दृष्टीने इलेक्ट्रिक क्रेटा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

फीचर्स

नवीन इलेक्ट्रिक Creta मध्ये लेव्हल 2 ADAS, 10.25 इंच टच स्क्रीन सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, Apple कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, 8 स्पीकर साउंड सिस्टम, डॅशकॅम, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड, टाइप सी चार्जिंग पोर्ट यासारखे फीचर्स मिळू शकतात. तसेच यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स, सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS यासह अनेक फीचर्स यात मिळू शकतात.

या इलेक्ट्रिक कार्सही लवकरच होणार लॉन्च

Hyundai Creta EV सोबत Maruti Suzuki आणि Tata Motors च्या नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लॉन्च केल्या जाऊ शकतात. याची किंमत सुमारे 20-25 लाख रुपये असू शकते.

यात सर्वात परवडणारी XUV400 आहे. ज्याची किंमत 15.49 लाख ते 17.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर MG ZS EV ची किंमत 18.98 लाख ते 24.98 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT