HSRP Plate  
बिझनेस

HSRP Plate: HSRP च्या बनावट नंबर प्लेटमुळे वाहनधारकांची फसवणूक; कशी ओळखाल खरी HSRP नंबर Plate

HSRP Plate: राज्यामध्ये वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक असणार आहे. जर एचएसआरपी नंबर प्लेट लावली नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

देशातील बहुतेक राज्यात जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे काम सुरू आहे. राज्यात दुचाकी, चारचाकी किंवा जड वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. या नंबर प्लेटचे दर हे इतर राज्यातील दरांप्रमाणेच असणार आहे. मात्र काही खासगी कंपन्यांकडून दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारली जात आहे. तर काही डिलर बनवाट प्लेट देत असल्याचा आरोप केला जात आहे.

राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदेमध्ये प्राप्त कमी दर दिलेल्या तीन निविदाकारांची निविदा मान्य करुन उच्चाधिकार समितीने ३ कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत.

रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि. Rosmerta Safety systems LTD

रीअर मेझॉन इंडिया लि. Real Mazon India LtD.

एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. FTA HSRP solutions Pvt. LtD. या तीन कंपन्यांना या नंबर प्लेटसाठी कंत्राट देण्यात आले आहे.

कुठे मिळेल HSRP नंबर प्लेट?

transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल. तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करावे. मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देण्यात येईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करण्यात आली.

राज्य सरकारच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत ही नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे. जर ही नंबर प्लेट बसवली नाही तर आरटीओकडून तुमच्यावर कारवाई होईल. या नंबर प्लेटची किंमत प्रत्येक वाहनासाठी वेगळी आहे. मोटर सायकल आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये यासोबतच जीएसटीचा त्यात समाविष्ट करून एवढी किंमत मोजावी लागेल.

नंबर प्लेट कशी ओळखाल

वाहनधारकांची फसवणूक होऊ नये, यासाठी खरी नंबर प्लेट कशी ओळखी यावी याबाबत हाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष RTA, RTO, डॉ. बाबा शिंदे यांनी माहिती दिलीय. 9 डिजिटचा नंबर प्लेटवर डिस्प्ले झालेला कोड हाच बारकोड आहे. यालाच युनिक आयडेंटिटी कोड म्हणतात.

हा पुढील नंबर प्लेटमध्ये व मागील नंबर प्लेटमध्ये असतो. नंबर प्लेटमध्ये व्हॉट हॉट स्टॅम्पेड होलोग्राम त्याच्याखाली इंडियाचे आय एन डी अक्षर लिहिलेले असते. तसेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला स्नॅप लॉक असते.या नंबर प्लेट चे डुबलीकेशन करता येत नाही. तसेच या नंबर प्लेटच्या अक्षरांमध्ये सुप्रियर ग्रेड रिफ्लेक्टीव टेप बसवलेले असतात. 9 अंकी डिजिटल कोड प्रत्येक गाडीचा वेगळा असतो. सोबत जोडल्याप्रमाणे HSRP नंबर प्लेट वरील माहिती देत आहे. याचा फायदा वाहनचालकांना होणार आहे कशा पद्धतीने या नंबर प्लेट चा वापर होईल हे सांगता येत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: पंढरपूरात दीड लाख भाविकांची गर्दी; विठ्ठल-रूक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासांची प्रतीक्षा|VIDEO

Maharashtra Live News Update: आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला वेग

OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

Paneer Bhurji Recipe : टिफिनसाठी झटपट बनवा पनीर भुर्जी, एक घास खाताच मुलं होतील खुश

White Bread: नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

SCROLL FOR NEXT