HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपूर्वी हे काम कराच, अन्यथा बसेल ₹१०,००० दंड

HRSP Number Plate Registration Deadline: राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर १०,००० रुपये दंड भरावा लागेल.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सर्व वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहेत . जर तुमच्या वाहनाला एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे फक्त ३ दिवस उरले आहेत.

एचएसआरपी नंबरप्लेट काय आहे? (What is HSRP Number Plate)

एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट. ही नंबर प्लेट देशातील सर्वांना वाहनांना बसवायची आहे. २०१९ नंतरच्या वाहनांना ही नंबप्लेट आधीच बसवण्यात आली आहे. त्याआधीच्या वाहनांना बसवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. आतापर्यंत अनेकांची ही नंबरप्लेट बसवली आहे परंतु अनेकांना अजून बसवायची आहे.

जर एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? (What Happens If You Don’t Install HSRP Number Plate?)

जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. जर १५ ऑगस्टनंतर कोणतेही वाहन एचआरपी नंबरप्लेटशिवाय दिसले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान, तुम्ही १५ ऑगस्टपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल आणि तुमची अपॉइंटमेंट नंतरची असेल तरच तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

HSRP नंबरप्लेट कशी बसवायची? (How To Install HSRP Number Plate)

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुमची सर्व माहिती भरावी लागेल. गाडीचा आरसी नंबर वैगेरे याबाबत माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे सेंटर निवडायचे आहे. शुल्क भरायचे आहे. यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची तारीख समजेल. ते झाल्यानंतर तुम्हाला दिलेल्या दिवशी जाऊन ही नंबर प्लेट बसवायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muktagiri Waterfall: विकेंडचा प्लान बनला नसेल तर अमरावतीच्या 'या' धबधब्यावर भिजायला जा!

Shocking News: वेड्यासारखं प्रेम... रुग्ण तरुणीचा मृत्यू; पुरलेला मृतदेह घरी आणून ७ वर्षे सोबत राहिला डॉक्टर

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नवे वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

SCROLL FOR NEXT