E-Challan: मुंबईत दंड वसुलीला ब्रेक, तब्बल १००० कोटींच्या ई-चलानाची थकबाकी

Traffic 1000 Crore e Challan Unpaid in Mumbai: मुंबईत लाखो नागरिक खाजगी वाहनाने प्रवास करतात. दरम्यान, मुंबईत जवळपास १००० कोटी रुपयांचे ई-चलान अजूनपर्यंत वाहनधारकांनी भरलेले नाही.
E-Challan
E-ChallanSaam Tv
Published On

मुंबई हे गजबजलेलं शहर आहे.मुंबईत रोज लाखो लोक वाहनांनी प्रवास करतात. कॉलेज असो किंवा ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण खाजगी वाहनांचा वापर करतात. मुंबईत वाहतूकीचे नियम मोडूनदेखील अनेकजण प्रवास करतात. वाहतूकीचे नियम मोडणे हे वाहनचालकांच्या जीवावरदेखील बेतू शकते. परंतु जर तुम्ही वाहतूकीचे नियम मोडले तर तुम्हाला दंड भरावा लागतो. तुम्हाला ई-चलान भरावे लागते. आतापर्यंत मुंबईत तब्बल १००० कटी रुपयांचे ई चलान भरले नाहीयेत.

E-Challan
Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

१,८१७ कोटींचा दंड (E Challan Fine of 1817 Crore)

२०२० पासून ते ११ जुलै २०२५ पर्यंत तब्बल १००० कोटी रुपयांचे ई-चलान भरण्यात आलेले नाही.कल्याणचे रहिवासी उन्नीकृष्णन एन यांना माहिती अधिकारानुसार ही माहिती मिळाली. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी १,८१७ कोटींच्या दंडापैकी ८१७ कोटी रुपये वसूल केले आहेत. अजून १००० कोटी रुपयांचा दंड बाकी आहे. दरम्यान, जुलै २०२५ मध्ये प्रलंबित थकबाकी २१५ कोटी रुपयांनी वाढली आहे. जी २०२३ पेक्षा जास्त आहे.

२०२० ते २०२५ या काळात ३.२ कोटी रुपयांचे ई-चलान जारी करण्यात आले. एप्रिल २०२५ पासून मद्यपान करुन वाहन चालवल्यामुळे ७९५ ड्रायव्हिंग लायसन्सदेखील रद्द करण्यात आले आहे.

E-Challan
Mumbai : कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवला अन् कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवलं, पोलिसांनी घडवली अद्दल

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे करावाई

वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी गुन्हेगारांची माहिती ऑनलाइन पोस्ट केली जाते. त्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यासाठी वाहतूक विभागाकडे पाठवले जातात. दरम्यान, १ जानेवारी ते २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाहतूक पोलिसांनी ५५८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यातील ई चलान पोर्टलवर १.८ लाख ऑनलाइन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

E-Challan
Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, दगडूशेठ गणपती दर्शनासाठी विशेष नियोजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com