E-Challan Filling: ई-चलान पाठवलंय? अशी कमी करता येईल रक्कम, फक्त एक गोष्ट करा!

How to Pay E Challan In Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालत तुमच्या ई-चलानची रक्कम कमी करण्यासाठी मदत करेन.
E-Challan
E-ChallanSaam Tv
Published On

Steps To Pay E Challan In Lok Adalat

वाहतुकीचे नियम मोडल्यास ई-चलान कापले जाते. हे तर सर्वांनाच माहीत असेल. जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तर ते रस्त्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यांत कैद होतं आणि फाइन म्हणून चलान थेट तुमच्या मोबाईलवर दाखवले जाते. दंडाची रक्कम तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येऊ शकते. जर तुमच्याही नावावर ई चलान कापले गेले असेल. तुम्ही ते अजून भरले नसेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या ई चलानची रक्कम कमी करु शकता.

राष्ट्रीय लोकअदालत तुमचे ई-चलान कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करेन. देशात लोकअदालतीचं आयोजन केलं जातं. या वर्षी ९ सप्टेंबर रोजी लोकअदालत भरवली जाणार आहे. हे प्लॅटफॉर्म तुम्हाला ई-चलानची रक्कम कमी करण्यास मदत करते. याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

E-Challan
No Shower Right Before Bed: सवय असेल तर आजच बदला! रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची चूक करताय? जडू शकतात आजार

लोकअदालत कशी मदत करेन?

लोकअदालतीच्या मदतीने तुम्ही तुमच्या चलनाची रक्कम कमी किंवा माफ करु शकता. यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. लोकअदालतसाठीची नोंदणीची माहिती पुढीलप्रमाणे

नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://delhitrafficepolice.nic.in/notice/lokadalat या वेबसाईटवर जावे लागेल. लोकअदालतसाठी ऑनलाइन बुकिंग ९ सप्टेंबरपूर्वी ४८ तास सुरू होईल. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाइटवर मिळेल. येथून तुम्हाला माहिती डाउनलोड करावी लागेल. यादरम्यान, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत कापलेल्या चलनावर निर्णय घेतला जाईन.

E-Challan
OTP API Scam : सावधान! एकाच वेळी OTP चे अनेक मेसेज येताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं...

या लिंकवर गेल्यानंतर, नोटीस/चलानची प्रिंटआउट येथून डाउनलोड करावी लागेल. ही नोटीस घेऊन तुम्हाला कोर्टात जावे लागेल. यावर तुम्हाला वेळ आणि तारीख देखील लिहलेली असते. येथे न्यायदंडाधिकाऱ्यांना हे चलन दाखवावे लागेल आणि त्यानंतर येथूनच निकाल सुनावण्यात येईल. नोटीस/चलान शिवाय तुमचे काम शक्य होणार नाही.

E-Challan
SBI vs Post Office RD : बँक की, पोस्ट ऑफिस गुंतवणूकीसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? अधिक रिटर्न्स कुठून मिळेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com