HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: वाहनचालकांनो, तुम्ही 'ही' चूक केलीये; रविवारपासून रोज ₹१००० दंड

HSRP Number Plate Penalty: वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले होते. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेट अनिवार्य

मुदत संपली, अजूनही नंबरप्लेट बसवली नाही?

भरावा लागणार दंड

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदत आता संपली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांनी नंबरप्लेट बसवली नाही. त्यामुळे आता कारवाई केली जाणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी खूप अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता कारवाई केली जाणार आहे.

१५ फेब्रुवारीपासून होणार कारवाई (HSRP Number Plate Not Installed Then You Have to Pay Fine)

१५ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली आहे. फक्त १० लाख ७० हजार वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जवळपास १५ लाख वाहनांना नंबरप्लेट बसवलेली नाही. यानंतर आता ज्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढ करुनदेखील अनेकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. मुदत संपली तरीही वाहनधारकांवर कारवाई झालेली नाही. वाहनचालकांना काही वेळ मिळावा, म्हणून कारवाई केली नव्हती. मात्र, आता १५ फेब्रुवारीनंतर वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दंड किती भरावा लागणार?

एचएसआरपी नंबरप्लेट ही सुरक्षेच्या दृष्टीने बसवली जात आहे. सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी गेल्या वर्षापासून मोहिम राबवण्यात येत आहे. यानंतरही नंबरप्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांना १००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. रोज वाहनचाकांना १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT