How To Update Pan Card Details Saam Tv
बिझनेस

How To Update Pan Card Details : पॅन कार्डवरील नाव किंवा जन्म तारीख चुकली आहे ? मग या ऑनलाइन स्टेप्सने करा अपडेट

कोमल दामुद्रे

How To Update Pan Card Online : पॅन कार्ड हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे. याचा वापर ITR File करण्यापासून ते बँकेचे खाते उघडण्यापर्यंत पॅन कार्ड आवश्यक असते. जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

परंतु, जर तुमच्या पॅन कार्डमध्ये काही चुका असतील तर तुमची महत्त्वाची कामे रखडली जातील. अशा परिस्थतीत तुम्ही पॅनमधील माहिती नेहमी अपडेट आणि बरोबर ठेवावी. जर पॅन कार्डवरील नाव किंवा जन्म तारीख चुकली असेल तर तुम्ही या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करुन ते अपडेट करु शकतात.

1. पॅन कार्ड कसे अपडेट करायचे?

  • पॅन कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम NSDL PAN किंवा UTIITSL PAN च्या वेबसाइटला (Website) भेट द्यावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला माहिती अपडेट करण्यासाठी अर्ज (Apply) करावा लागेल. पॅनवरील माहिती अपडेट करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात.

2. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • पॅन कार्ड (Pan card) अपडेटसाठी NSDL PAN च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • यानंतर तुम्हाला पॅन कार्डचा डेटा बदलण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन प्रकाराच्या पर्यायावर जावे लागेल आणि पॅन डेटामध्ये बदल किंवा दुरुस्तीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला योग्य श्रेणी निवडावी लागेल.

  • त्यानंतर पॅन क्रमांक टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • यानंतर तुमचे नवीन पेज उघडेल. तुम्हाला सर्व माहिती अपडेट करावी लागेल जी तुम्हाला दुरुस्त करायची आहे.

  • त्यानंतर पुरावे कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज करताना लागणारी फी भरा व सबमिट बटणावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट झाले आहे की, नाही हे तपासू शकतात.

3. पॅन अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड

  • आधार कार्ड

  • मतदार ओळखपत्र

  • वीज बिल

  • पासपोर्ट

  • बँक स्टेटमेंट

  • ड्रायव्हिंग लायसन्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

SCROLL FOR NEXT