torres  saam tv
बिझनेस

Torres Investment Scam: '२५ दिन मे पैसा डबल'ला बळी पडू नका; टोरेस सारख्या Scam पासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्या

Safety Tips For Investment To Avoid Any Investment Scam: टोरेस कंपनीने हजारो लोकांना हजारो कोटींचा चूना लावला आहे. दरम्यान या स्कॅमपासून कशी काळजी घ्यायची? जाणून घ्या.

Ankush Dhavre

अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांचा फिर हेरा फेरी चित्रपट पाहिला नसेल, असे फार कमीच लोकं असतील. बिपाशा बासू '२५ दिन मे पैसा डबल' ही स्किम घेऊन अक्षय कुमारच्या घरी जाते आणि त्याला पैसा गुंतवण्यासाठी सांगते. २५ दिवसात पैसे डबल होतील, म्हणून अक्षय कुमार पैसे इन्व्हेस्ट करतो.

मात्र २५ दिवसानंतर जेव्हा तो पैसे घेण्यासाठी जातो, तेव्हा तिथे काहीच नसतं. 'लक्ष्मी चिट फंड' वाले कोटींचा चूना लावून फसार होऊन जातात. आता २०२५ मध्ये असाच काहीसा चूना टोरेस ज्वेलरी ब्रँडने लावला आहे.

पैसा दुप्पट, चौपट होणार म्हणून भोळ्या भाभड्या म्हणावं की लालची अशा गुंतवणूकदारांनी आपली जमापूंजी पणाला लावून दिली. काहींनी कर्ज काढलं, तर काहींनी घरदार विकून टाकलं. मात्र त्यांच्या हाती काहीच आलेलं नाही. टोरेस कंपनीचा मालक कितीतरी हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे.

आता या गुंतवणूकदारांनी काय चूक केली? तर कुठलीही चौकशी न करता पैसै गुंतवले. मासा गळाला लावण्यासाठी जसा चारा दिला जातो, तसंच काहीसं इथे झालं. सुरुवातीला पैशांवर रिटर्न्स मिळाले.

पण लोकं आपल्या जाळ्यात फसताय हे दिसताच, टोरेसच्या मालकाने पैसा घेऊन पळ काढला. हजारो लोकं या स्कॅमला बळी पडले आहेत. पण इथून पुढे तुम्ही अशा स्कॅमला बळी पडू नका. त्यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या.

कंपनीचा इतिहास तपासा:

सर्वात आधी ती कंपनी किती वर्षांपासून कार्यरत आहे, हे तपासून पाहा. आतापर्यंत या कंपनीने किती लोकांना पैसे रिटर्न केले आहेत,याची कसून चौकशी करा.

सेबी नोंदणी आहे का?:

ती कंपनीत तुम्ही गुंतवणूक करणार आहात ती SEBI (Securities and Exchange Board of India) नोंदणीकृत आहे की नाही, हे तपासा.

फसवणुकीच्या ऑफर टाळा:

"पैसे दुप्पट" किंवा "झटपट नफा" देणाऱ्या ऑफरवर विश्वास ठेवू नका.अशा ऑफर्स हे गुंतवणूकदारांना फसवण्यासाठीच असतात. त्यामुळे जरा खबरदारी घ्या.

ग्राहकांचे अनुभव वाचा:

यापूर्वी ही काही ग्राहक असतील, ज्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली असेल. कंपनीबद्दल इतर गुंतवणूकदारांचे अभिप्राय आणि अनुभव तपासा.

कायद्याच्या कागदपत्रांची खात्री:

गुंतवणुकीपूर्वी कंपनीकडून सर्व कायदेशीर दस्तऐवज आणि कागदपत्रे मिळवा.

व्यवसाय मॉडेल समजून घ्या:

कंपनी कशाप्रकारे उत्पन्न निर्माण करते, ते व्यवसाय मॉडेल समजून घ्या. काही गडबड वाटत असेल, तर त्वरीत माघार घ्या.

वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या:

सर्वात महत्वाचं म्हणजे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

फसवणुकीच्या लक्षणांची ओळख:

अती उच्च परतावा, दबाव टाकून गुंतवणूक करायला सांगणे, आणि पारदर्शकतेचा अभाव या फसवणुकीच्या लक्षणांपासून सावध राहा.

करार काळजीपूर्वक वाचा:

गुंतवणुकीचा करार नीट वाचा आणि अटी-शर्तींची समजूत करून घ्या. कुठलीही घाई गडबड करु नका.

तांत्रिक अभ्यास करा:

गुंतवणुकीचे तांत्रिक फायदे आणि धोके समजून घेण्यासाठी वेळ द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT