Tax Saving Tips  saam Tv
बिझनेस

Tax Savings : पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुनही वाचवता येईल कर; वाचा काय आहे नियम?

Tax Saving ideas : मार्च महिना जवळ आला की, अनेकांना टेन्शन येते ते टॅक्स भरण्याचे आणि वाचवण्याचे. आर्थिक वर्ष २०२३-२४ लवकरच संपणार असून प्रत्येकजण कर वाचवण्याच्या तयारीत आहे.

कोमल दामुद्रे

How To Save Tax :

मार्च महिना जवळ आला की, अनेकांना टेन्शन येते ते टॅक्स भरण्याचे आणि वाचवण्याचे. आर्थिक वर्ष २०२३-२४ लवकरच संपणार असून प्रत्येकजण कर वाचवण्याच्या तयारीत आहे. जर तुम्हालाही टॅक्स वाचवायचे असेल तर तुम्ही ही आयडिया वापरु शकता.

पत्नीच्या खात्यात पैसे (Money) ट्रान्सफर करता का? तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा काही कामासाठी पैसे दिले आहेत का? जर देत असाल तर तुम्ही टॅक्स (Tax) भरण्यापासून वाचवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

आयकर कायद्याच्या कलम ६० ते ६४ मध्ये क्लबिंग ऑफ इन्कमची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्याकडून मिळालेल्या उत्पन्नावर तुमच्या नावावर कर कापला गेला असेल तर त्याला उत्पन्नाचे क्लबिंग म्हणतात. हा नियम वैयक्तिक करदात्यांना लागू होतो. जाणून घेऊया कर कसा वाचवायचा त्याविषयी

तुम्ही तुमच्या पत्नीला २ लाख रुपये दिले आणि तिने ते पैसे फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्समध्ये गुंतवले (Investment) तर त्यातून मिळणारी रक्कम तुमच्या नावावर येईल. ज्यामुळे तुम्हाला कर भरावा लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचे घर भाड्याने दिले असेल आणि घर तुमच्या नावावर असेल तर त्यातून मिळणारे उत्पन्नाचा देखील करमध्ये जोडला जाईल.

1. तुम्ही कर कसा वाचवू शकता?

  • ज्यांचे लग्न होणार आहे. त्यांनी लग्नाआधी आपल्या भावी पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता किंवा भेटवस्तू केली तर ती मिळकत एकत्र करण्याच्या तरतुदीत येत नाही.

  • जर तुम्ही पत्नीला खर्चासाठी पैसे दिले असतील आणि त्यातून तिने बचत केली असेल तर ते तुमच्या उत्पन्नात जोडले जाणार नाही.

  • तसेच तुम्ही आरोग्य विम्याद्वारे कर वाचवू शकता. कलम 80D अंतर्गत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या नावावर आरोग्य विमा प्रीमियमवर २५,००० रुपयांपर्यंत बचत करु शकता.

  • गुंतवणुकीसाठी तुम्ही जॉइंट अकाउंट ओपन करु शकता. यासाठी तुम्ही प्राइमरी होल्डर असणे गरजेचे आहे. ज्याची टॅक्स लायबिलिटी कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT