Electricity Bill SAAM TV
बिझनेस

Electricity Bill : वीज बिल हरवले? फक्त २ मिनिटांत मोबईल फोनवरून मिळेल, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

How To Download Electricity Bill Online : घरी आलेले वीज बिल नकळत तुमच्याकडून हरवले असेल तर टेन्शन सोडा. वापरकर्ते आता काही मिनिटांतच आपल्या मोबाईल फोनवरून वीज बिले मिळवू शकतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे.

Shreya Maskar

वीज बिल हे महत्त्वाचे कागदपत्र आहे.

वीज बिल हरवले असेल तर ते घरबसल्या तुम्ही डाउनलोड करू शकता.

तुम्ही ऑनलाइन सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने वीज बिल डाउनलोड करू शकता.

आजकाल प्रत्येक कामासाठी आधार कार्डसोबतच वीज बील देखील लागते. मात्र अनेक वेळा वीज बील आपल्याकडून हरवते, अशावेळी काय करायचे हे लोकांना पटकन समजत नाही. त्यामुळे लोकांचे काम सोपे आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही फक्त १-२ मिनिटांत डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर वीज बिल डाउनलोड करू शकता. तुमचे वीज बिल पाहण्यासाठी तुम्हाला आता वेगवेगळ्या वेबसाइट्स किंवा कार्यालयांना भेट देण्याची गरज नाही.

नवीन अपडेटमुळे वापरकर्ते आता थेट डिजिलॉकर ॲपद्वारे त्यांची वीज बिले पाहू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे बिल थेट वीज कंपनीच्या डेटाबेसमधून येते आणि त्यावर Verified असा टॅग असतो. याचा अर्थ, तुमचे बिल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आता वेगवेगळ्या साइट्सना भेट देण्याची गरज नाही. ऑनलाइन वीज बील डाउनलोड करणे खूपच सोपे आहे.

विज बील कसे डाउनलोड करावे?

  • सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला एक सिक्योरिटी पिन (Security PIN- Password) टाकावा लागेल.

  • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला 'वीज बिल' शोधावे लागेल. त्यानंतर, तुमची वीज कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.

  • तुमचे बिल थेट ॲपमध्ये दिसेल आणि तुम्ही ते डाउनलोड करून सेव्ह करू शकता.

डिजिलॉकरचे अनेक फायदे आहेत. तुमचे वीज बिल ॲपमध्ये सेव्ह केले जाईल आणि तुम्ही ते कधीही पाहू शकता. गरज भासल्यास तुम्ही ते डाउनलोड, प्रिंट, शेअर देखील करू शकता. हे वैशिष्ट्य मोबाईल आणि कॉम्प्युटर दोन्हीवर काम करते, म्हणजेच तुम्ही तुमचे कागदपत्रे कुठूनही - कधीही पाहू शकता.

नवीन प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे.डिजिलॉकरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने मोबाईल ओटीपी, पिन आणि एन्क्रिप्शनसह सुरक्षेच्या अनेक पद्धती लागू केल्या आहेत. यामुळे तुमची कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ते पाहू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

SCROLL FOR NEXT