बिझनेस

AI Video Creation: व्हिडिओ मेकिंग सोपं झालं! स्क्रिप्ट अपलोड करा आणि बघा कमाल, कोणतं आहे नवीन फिचर? वाचा सविस्तर

Script To Video: पूर्वी लोक व्हिडिओ बनवायला तासन् तास खर्च करायचे, पण आता AIच्या मदतीने फक्त प्रॉम्प्ट देऊन सहज आणि वेगाने व्हिडिओ तयार करता येतो. अनेक AI टूल्स उपलब्ध आहेत.

Dhanshri Shintre

  • एआयच्या मदतीने व्हिडिओ बनवणे आता अगदी सोपे आणि वेगवान झाले आहे.

  • फक्त स्क्रिप्ट अपलोड करून तुम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ तयार करू शकता.

  • नवीन फिचर्समुळे पार्श्वभूमी संगीत, व्हॉइस ओव्हर आणि सबटायटल्स मिळणे सोपे झाले आहे.

  • एआय टूल्समुळे एडिटिंगसाठी लागणारा वेळ आणि मेहनत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

आजकाल व्हिडिओ निर्मितीत एआयचा वापर वाढत चालला आहे. काही व्हिडिओ पूर्णपणे AI द्वारे तयार केले जातात आणि ते इन्स्टाग्राम, फेसबुक व यूट्यूबवर व्हायरल होतात. पूर्वी ज्यांना एडिटिंगमध्ये तास लागू लागायचे, ते आता काही मिनिटांत सहज तयार होतात. एआयमुळे व्हिडिओ एडिटर्सचे काम सोपे झाले आहे, तसेच ज्यांना एडिटिंग येत नाही, तेही फक्त प्रॉम्प्ट देऊन व्हिडिओ तयार करू शकतात. तुम्ही कोणते AI टूल्स वापरता ते आम्हाला नक्की सांगा.

जर तुम्हाला विश्वसनीय ब्रँडकडून व्हिडिओ तयार करायचा असेल, तर गुगल एआय स्टुडिओ हा उत्तम पर्याय आहे. या टूलमध्ये तुम्हाला फक्त एक सोपा प्रॉम्प्ट एंटर करावा लागतो आणि AI तुमच्या सूचनांनुसार व्हिडिओ तयार करते. प्रॉम्प्ट सहज समजण्याजोगा असावा, जेणेकरून AI योग्य प्रकारे काम करू शकेल. या टूलच्या मदतीने तुम्ही आधीचे व्हिडिओ सुधारू शकता आणि नवीन व्हिडिओसुद्धा सहज बनवू शकता, ज्यामुळे हे तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे.

जर तुम्हाला सोशल मीडिया किंवा YouTube साठी आकर्षक व्हिडिओ तयार करायचे असतील, तर हे AI टूल तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. यामध्ये तुम्ही स्क्रिप्ट एंटर करता आणि AI आपोआप व्हिडिओ क्लिप्स बनवते. याशिवाय, तुम्हाला पार्श्वभूमी संगीत, व्हॉइस ओव्हर आणि सबटायटल्स देखील या टूलमध्ये मिळतात. त्यामुळे अनेक कामे एकाच ठिकाणी करून, तुम्ही सहज आणि जलद दर्जेदार व्हिडिओ तयार करू शकता.

हे अत्याधुनिक AI टूल वापरून तुम्हाला एडिटिंगसाठी तासन्तास काम करावे लागत नाही. तुम्ही फक्त व्हिडिओची स्क्रिप्ट लिहून अपलोड करा आणि AI अँकर ती स्क्रिप्ट सादर करून व्हिडिओ तयार करेल. हे टूल सुरुवातीला मर्यादित कालावधीसाठी मोफत वापरता येते, त्यानंतर सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला काही काळ मोफत सेवा हवी असेल तर हा पर्याय उपयुक्त आहे, आणि नंतर तुम्ही इच्छेनुसार सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT