diti Tatkare guides women on completing E-KYC for Ladki Bahin Yojana beneficiaries saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: E-KYC कशी करायची? खुद्द आदिती तटकरेंनीच लाडक्या बहिणींना दिली स्टेप बाय स्टेप माहिती

How to Complete E-KYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जर केवायसी केली नाहीत तर महिलांना पुढील १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य झालीय.

  • ई-केवायसी न केल्यास महिलांना पुढील १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही.

  • आधार कार्डद्वारे महिलांना ई-केवायसी करता येईल.

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी याची माहिती दिलीय. महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया लवकरात लवकर करावी.

ही प्रक्रिया सर्वांच्या हितासाठीच आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता व सुसूत्रता येणार आहे,असेही मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ई-केवायसी कसं करायची याची माहिती दिली.

आदिती तटकरेंची पोस्ट e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुख्य पेजवर e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. यात लाभार्थी महिलेनं आपला आधार क्रमांक आणि (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

आदिती तटकरेंची पोस्ट

e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मुख्य पेजवर e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

यात लाभार्थी महिलेनं आपला आधार क्रमांक आणि (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी Send OTP या बटणावर क्लिक करावे.

त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

मग लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की हे तपासलं जाईल.

जर आधीच केवायसी पूर्ण झाली असेल तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेन.

जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नमाज पडतानाच पडला बॉम्ब, क्षणातच मशिद झाली कब्रस्तान

परप्रांतीयांना जमीन विकायची नाही,कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव

Latur Crime: लातूर हत्याप्रकरण; राष्ट्रवादी पदाधिकारी अनमोल कवठे, सोनाली भोसलेच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर

Raw Banana: कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Poonam Pandey: दिल्लीच्या रामलीलेत पूनम पांडेची एंट्री; मंदोदरीच्या भूमिकेवरून पेटला नवा वाद

SCROLL FOR NEXT