Aadhaar-PAN Link Saam Tv
बिझनेस

Aadhaar-PAN Link: आधार-पॅन कार्ड लिंक केलंय? पण खरंच झालंय का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Aadhaar PAN Link Status Check: आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटचे २ दिवस उरले आहेत. जर तुम्ही अजूनही हे काम केले नसेल त लगेच करा. अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद होईल.

Siddhi Hande

आधार पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य

आधार पॅन लिंक आहे की नाही, असा चेक करा स्टेट्स

ऑनलाइन पद्धतीने आधार पॅन कार्ज कसं लिंक करायचं?

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त २ दिवस उरले आगे. तुम्ही जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेकांना आधार-पॅन लिंक केले आहे. तुमचं आधार पॅन लिंक झालं की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

आधार पॅन लिंक झालं की नाही असं चेक करा स्टेटस (Aadhaar Pan Link Status Online Check)

सर्वात आधी तुम्हाला www.incometax.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

तिथे तुम्हाला Link Aadhaar Statusहा ऑप्शन दिसेल.

यानंतर तुम्हाला आधार आणि पॅन नंबर टाकायचा आहे.

यानंतर Link Aadhaar Status वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे दिसेल. तर तुमचे आधार पॅन कार्ड लिंक नसेल ते तुम्ही करु शकतात.

आधार पॅन लिंक करण्याची प्रोसेस (Aadhaar-PAN Link Online Process)

सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर लिंक आधार हा ऑप्शन निवडा.

यानंतर तुम्हाला पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो टाकावा. ओटीपी व्हेरिफाय होईल.

ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी १००० रुपयांचे पेमेंट करायचे आहे. यानंतर पुढची प्रोसेस होईल.

यानंतर काही दिवसात तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल. याचा स्टेट्‍स तुम्ही Quick Links वर जाऊन चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT