Mutual Funds google
बिझनेस

SIP Investment: १० वर्षांत ₹५० लाख कमवण्याचे स्वप्न होईल साकार! दरमहा किती SIP करावी लागेल? जाणून घ्या

Mutual Funds: फक्त शिस्तबद्ध SIP गुंतवणुकीद्वारे १० वर्षांत ₹५० लाखांचा निधी तयार करणे शक्य आहे. जाणून घ्या दरमहा किती SIP रक्कम लागेल आणि कोणत्या परताव्याने उद्दिष्ट साध्य होईल.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकाचंच स्वप्न असतं की, त्यांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची सेविंग असावी. काहींना वाटतं की हे प्रत्यक्षात होण्यासाठी मोठी लॉटरी लागावी लागते किंवा उत्पन्न खूप जास्त असावे लागते. मात्र वास्तविकता अशी नाही. योग्य आर्थिक नियोजन, शिस्त आणि गुंतवणुकीबाबत थोडीशी समज असली तरी आपण सहजपणे १० वर्षांत ₹५० लाखांचा निधी तयार करू शकतो. याचे संपूर्ण नियोजन जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुमचं ध्येय २०३५ पर्यंत ₹५० लाखांचे भांडवल उभारण्याचे असेल, तर त्यासाठीचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) मदतीने म्युच्युअल फंडांमध्ये नियमित गुंतवणूक करा. SIP मध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवा आणि दीर्घकाळात चक्रवाढ परताव्यामुळे मोठे भांडवल तुम्हाला मिळेल.

गुंतवणूक कशी करावी?

वेगवेगळ्या परताव्याच्या दरानुसार १० वर्षांत ₹५० लाखांचा फंड तयार करण्यासाठी लागणारी मासिक SIP पुढीलप्रमाणे असेल.

९% परताव्यावर तुम्हाला दरमहा ₹२५,८३७ ची SIP करावी लागेल. ज्यातून एकूण अंदाजे ₹३१ लाखांची गुंतवणूक होईल.

१०% परताव्यावर दरमहा ₹२४,४०८ गुंतवल्यास ₹२९.२९ लाखांच्या गुंतवणुकीतून ₹५० लाखांचा निधी तयार होईल.

११% परताव्यावर मासिक SIP ₹२३,०४१ असेल, ज्यातून ₹२७.६५ लाखांची गुंतवणूक होईल.

तर १२% परताव्यावर दरमहा ₹२१,७३५ गुंतवल्यास केवळ ₹२६.०८ लाखांच्या गुंतवणुकीतून ₹५० लाखांचा फंड तयार होऊ शकतो.

व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार, इक्विटी फंडांमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होत असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत हा धोका कमी होतो आणि परताव्याचे प्रमाण वाढते. यशस्वी SIP चे गुपित म्हणजे लवकर सुरुवात करा, नियमित गुंतवणूक करा आणि दीर्घकाळ गुंतवणूक टिकवा.

गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. त्यामध्ये SIP किमान १० वर्षे किंवा त्याहून जास्त काळ सुरू ठेवा. बाजार कोसळला तरी गुंतवणूक थांबवू नका, कारण अशा काळात मिळणारे युनिट्स भविष्यात जास्त परतावा देतात. दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि शक्य असल्यास SIP टॉप-अप वाढवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; आता भाजप घेणार हरकती, नेमकं काय घडलं?

MIDC Factory fire : चिपळूण एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, VIDEO

Shocking : इंजिनीअर तरूण लैंगिक समस्येनं हैराण, जडीबुटीवाल्या बाबाकडं गेला अन् ४८ लाखांना फसला, किडनीही फेल

Lemon Rice Recipe: पारंपारिक पद्धतीचा लेमन राईस कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT