Railway Ticket Refund News Saam tv
बिझनेस

Ticket Refund : रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

Railway Ticket Refund News : रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? हे तिकीट कधी रद्द केली जाते यावर अवलंबून असते. एसी, स्लीपर आणि सेकंड क्लास तिकीट रिफंडचे संपूर्ण नियम जाणून घ्या.

Alisha Khedekar

रेल्वे तिकीट रद्द केल्यावर रिफंड मिळतो

४८ तासांपूर्वी रद्द केल्यास निश्चित रक्कम वजा

१२ ते ४८ तासांत रद्द केल्यास २५% शुल्क

चार्ट तयार होण्यापूर्वी रद्द केल्यास ५०% रक्कम वजा

आपण नेहमी फिरण्याच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने आणि अशा अनेक कारणाने रेल्वे प्रवास करतो. काही एसीमध्ये, काही स्लीपरमध्ये आणि काही सामान्यपणे प्रवास करतात. यासाठी पूर्वीपासून नियोजन करून तिकिटे आरक्षित केली जातात. ज्यामुळे आपला प्रवास हा आरामदायी आणि सुखकर होऊ शकेल. मात्र कधीकधी काही कामानिमित्त किंवा अडचणींमुळे आपण प्रवास करू शकत नाही. अशा परिस्थितीत, रेल्वे तिकीट रद्द करावं लागतं. तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात परतफेड येते. मात्र तुमचे एसी किंवा स्लीपर ट्रेन तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला किती परतफेड मिळते? हे माहिती आहे का?

रेल्वेतील एसी कोचचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क तुम्ही ते तिकीट कधी रद्द करता यावर अवलंबून असते. जर ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ४८ तासांपूर्वी कन्फर्म तिकीट रद्द केले तर, एसी फर्स्ट क्लास/एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २४०/- रुपये आकारले जातात.

तर एसी २ टियर/फर्स्ट क्लाससाठी २००/- रुपये, एसी ३ टियर/एसी चेअर कार/एसी ३ इकॉनॉमीसाठी १८०/- रुपये, स्लीपर क्लाससाठी १२०/- रुपये आणि सेकंड क्लाससाठी ६०/- रुपये रद्द करण्याचे शुल्क आहे. प्रत्येक प्रवाशाला तिकीट रद्द करण्याचे शुल्क आकारले जाते.

जर कन्फर्म केलेले तिकीट ट्रेन सुटण्याच्या ४८ तासांच्या आत आणि १२ तासांपूर्वी रद्द केले गेले, तर त्याचे शुल्क तिकीट दराच्या २५% असेल. ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेच्या १२ तासांपेक्षा कमी आणि चार तासांपूर्वी किंवा चार्ट तयार होईपर्यंत, जे आधी असेल ते रद्द केल्यास, ५०% तिकीट शुल्लक वजा केले जाईल. लक्षात ठेवा की चार्ट तयार करण्याचा वेळ हा ट्रेनच्या मूळ स्थानकापासून किंवा शेवटच्या चार्ट तयार करण्याच्या स्टेशनपासूनचा वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ज्ञानगंगा अभयारण्यात आणलेला साडेतीन वर्षांचा वाघ जंगलात मुक्त

Kolhapur Politics: कोल्हापुरात अजितदादांना शिंदेंचा 'दे धक्का'; ऐन निवडणुकीत महिला नेत्यानं सोडला पक्ष

Maharashtra Politics: बेट्या जेवढं तुझं वय आहे ना..., भाजपचे माजी मंत्री आणि अजित पवारांच्या आमदाराचा एकमेकांवर जोरदार प्रहार

Animal Facts: कोणत्या प्राण्याला असतात ५ हृदय? उत्तर वाचून विश्वासच बसणार नाही

Chicken Chilli Recipe: घरी हॉटेल स्टाईल चिकन चिली कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT