Savings Account  google
बिझनेस

Savings Account : बचत खात्यावर किती पैसे ठेवता येतात? तुमच्या व्यवहारांवर असेल आयकर विभागाची नजर, जाणून घ्या नियम

Income Tax Rules : बचत खात्यात पैसे ठेवण्यावर थेट कमाल मर्यादा नाही, मात्र मोठ्या रोख ठेवींवर रिपोर्टिंग नियम लागू होतात. ₹10 लाखांवरील व्यवहार, उत्पन्नाचा स्त्रोत आणि ITR माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

देशातल्या कोट्यावधी नागरिकांचे बँकांमध्ये बचत खातं आहे. पगार, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न किंवा इतर बचत सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर Savings Account चा वापर केला जातो. मात्र बचत खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा करताना आयकर विभागाच्या काही नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. विशेषत: मोठ्या रकमेच्या रोख व्यवहारांकडे आयकर विभागाचे लक्ष जाऊ शकतं.

बचत खात्यात ठरावीक रकमेपेक्षा जास्त पैसे ठेवले म्हणून थेट आयकर विभागाची नोटीस येते, असं नाही. पण आर्थिक वर्षात बचत खात्यात एकूण १० लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या रोख ठेवी झाल्यास बँकेला त्याची माहिती संबंधित यंत्रणेला कळवावी लागते. चालू खात्यांसाठी ही मर्यादा ५० लाख रुपये आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार करताना त्याचा योग्य स्त्रोत आणि कागदपत्रे असणे महत्त्वाचे ठरते.

तुमच्या उत्पन्नानुसार बँक खात्यातले व्यवहार असतील आणि ITR मध्ये उत्पन्नाची अचूक माहिती दिली असेल, तर फक्त मोठी रक्कम खात्यात असल्यामुळे नोटीस येईलच असं नाही. मात्र घोषित उत्पन्न आणि खात्यातले व्यवहार यामध्ये मोठी तफावत आढळल्यास आयकर विभागाकडून स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.

वारंवार मोठ्या रकमेचे रोख व्यवहार करणं, उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्ट नसणे, ITR दाखल न करता मोठ्या आर्थिक व्यवहार करणे किंवा PAN संबंधित माहितीमध्ये त्रुटी असणे यामुळेही करदात्यांच्या व्यवहारांची छाननी होऊ शकते. संशयास्पद व्यवहार आढळल्यावर संबंधित व्यक्तीकडून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.

त्यामुळे बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा पैशांचा स्त्रोत काय आहे आणि त्याची योग्य नोंद आणि कर विवरणपत्रात माहिती दिली आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना बँकेचे नियम आणि आयकराशी संबंधित तरतुदी समजून घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT