PM Mudra Yojana Saam Tv
बिझनेस

Pradhan Mantri Mudra Yojana: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे? 'या' योजनेद्वारे मिळवा कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज

PM Mudra Loan: केंद्र सरकार वेगवेगळ्या विभागांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असते. त्यापैकीच एका योजनेची माहिती आज जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How get Pradhan Mantri Mudra Yojana Loan

अनेकांना स्वतःच्या मालकीचा व्यवसाय सुरू करायचा असतो. मात्र, अनेकदा पैशांची खूप अडचण येते. अशा परिस्थितीत, लोकं बँकांकडे वळतात. परंतु, बऱ्याचदा कागदपत्रांच्या पूर्तता न झाल्यामुळे कर्ज मिळणं कठीण होतं. अशा परिस्थितीत देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने (Pradhan Mantri Mudra Yojana) प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. (latest scheme news)

या योजनेद्वारे आपण कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज (PM Mudra Loan) मिळवू शकतो. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुद्रा कर्जाचे प्रकार

प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे शिशु कर्ज होय. या अंतर्गत, तुम्ही पहिल्यांदा व्यवसाय सुरू करता, तेव्हा सरकार 5 वर्षांसाठी कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज (Pradhan Mantri Mudra Yojana Loan) देते.

आधीच व्यवसाय करत असलेल्या लोकांनाही कर्ज दिले जाते. हे कर्ज त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी दिले जाते. जर तुम्ही 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले, तर ते किशोर कर्जाच्या श्रेणीत येतं. तरुण कर्ज हा तिसरा प्रकार आहे. या श्रेणी अंतर्गत, सरकार व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देतं.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी 24 ते 70 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक अर्ज (Mudra Yojana Loan) करू शकतो. कर्जाच्या अर्जाद्वारे, तुम्हाला आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट, पत्ता या पुराव्यांची आवश्यकता आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी mudra.org.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर मिळालेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती टाका. तो फॉर्म तुमच्या जवळच्या सरकारी किंवा खासगी बँकेत जमा करा. सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर बँक तुमचं कर्ज मंजूर करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Kalyan Police News : वाहतूक पोलिसांची मनमानी, चहा पिण्यासाठी रस्त्यात गाडी उभी केली, ट्रॅफिक जाममुळे नागरिक संतापले

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT