Crop Loan : उद्दिष्टाच्या ८ टक्केच पीक कर्ज वाटप; परभणी जिल्ह्याला ७४४ कोटीचे आहे उद्दिष्ट

Parbhani News : शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असताना या बँकांनी एक पाऊल पुढे टाकत आपले दिलेले उद्दिष्ट लवकरच पूर्ण करतील
Crop Loan
Crop LoanSaam tv
Published On

परभणी : परभणी जिल्हा प्रशासनाने खासगी, राष्ट्रीयकृत व व्यावसायिक बँकांना ७४४ कोटी ८३ लाख रुपयांचे (Parbhani) उद्दिष्ट पीक कर्जासाठी दिले होते. परंतु महिनाभरात केवळ बँकांनी ८.३१ टक्केच पीक कर्जाचे (Crop Loan) वाटप केले. त्यामुळे आगामी काळात या बँका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील का? याकडे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Crop Loan
Wardha Crime: हिंगणघाटात पोषण आहाराच्या काळाबाजार; १ लाख १ हजार ६१५ रुपयांचा धान्यसाठा जप्त

यंदाच्या खरीप हंगाम लहरीपणामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत गेला. यानंतर रब्बी हंगामात जिल्हा प्रशासनाने ७४४ कोटी ८३ लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकांना दिले. (Farmer) शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असताना या (Bank) बँकांनी एक पाऊल पुढे टाकत आपले दिलेले उद्दिष्ट लवकरच पूर्ण करतील; अशी अपेक्षा शेतकरी व प्रशासनाला होती. परंतु तसे होताना दिसून येत नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crop Loan
Recruitment News : खुशखबर! राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरतीला मुदतवाढ, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

१ ऑक्टोबरपासून सुरू झालेले रब्बीचे पीक कर्ज वाटप १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत केवळ ८.३१ टक्केच पूर्ण केले आहे. परभणी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर, जिल्हा प्रशासनाने ही केवळ उद्दिष्ट न देता प्रत्येक महिन्यासाठी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यां कडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com