Shraddha Thik
क्रेडिट कार्डचा वापर करुन आपण अनेक बिल काही दिवसांनी भरु शकतो.
तुम्ही जर एखादी पॉलिसी घेत असाल तर त्या कर्जाचे दर 8 ते 15 टक्के असते. तर क्रेडिट कार्डचे व्याजदर 20 टक्क्यांहून अधिक असते. त्यामुळे क्रेडिट कार्डवरुन पैसे भरणे तोट्याचे ठरु शकते.
त्यामुळेच कर्जाची परतफेड करण्यासाठी क्रेडिट कार्डच्या वापरावर बंदी घालण्याचे IRDAI ने निर्देश दिले आहेत.
क्रेडिट कार्डचा वापर करुन आपण अनेकदा वस्तू खरेदी करतो. मात्र, क्रेडिट कार्डचा वापर करुन कधीही कर्ज फेडू नये.
जर तुम्ही एखादी कार खरेदी केली आहे आणि त्याचे कर्ज क्रेडिट कार्डने फेडत असाल आणि मुदतीनंतर कर्ज भरल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो.
क्रेडिट कार्डने पैसे भरण्यासाठी 30 ते 50 दिवसांचा कालावधी असतो.
या कालावधीत जर तुम्ही पैसे भरले नाही तर व्याज वाढू शकते.