बिझनेस

Housing Society: हाऊसिंग सोसायटीतील मेंटेनन्सच्या पैशात घोटाळा झाला ? कुठे कराल तक्रार

Housing Society Maintenance Fund Scam: हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स फंडाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रहिवासी सहकारी संस्थांच्या निबंधकांकडे संपर्क साधू शकतात, ऑडिटची मागणी करू शकतात.

Bharat Jadhav
  • मेंटेनन्स निधीचा गैरवापर झाल्यास सहकार निबंधकाकडे तक्रार करता येते.

  • आवश्यक कागदपत्रांसह लेखी अर्ज करणे महत्त्वाचे.

  • विशेष ऑडिटची मागणी करण्याचा सभासदांना अधिकार आहे.

हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स फंडात घोटाळा झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. पण या तक्रारी कुठे करायच्या जेणेकरून दोषींवर योग्य कारवाई होईल. मेंटेनन्स शुल्क हे लिफ्ट, सुरक्षा, स्वच्छता, पाणी, वीज, दुरुस्ती अशा सामायिक सुविधांसाठी वापरणे अपेक्षित असते. मात्र काही ठिकाणी सोसायटीचे पदाधिकारी किंवा व्यवस्थापन समिती हे पैसे गैरवापर करत असल्याचे प्रकार समोर येत असतात. अशात याबाबतची तक्रार कुठे करावी याची माहिती नसल्यानं नागरिकांना पैसा अशाच सोडून द्यावा लागतो.

सोसायटीच्या खात्यातील रक्कम वैयक्तिक कारणांसाठी वापरणे, बनावट बिलांद्वारे पैसे काढणे, काम न करता खर्च दाखवणे, ठेकेदारांशी संगनमत करून जादा रक्कम देणे, वार्षिक हिशोब सदस्यांसमोर न मांडणे. अशा प्रकारे पारदर्शकतेचा अभाव असेल तर आर्थिक गैरव्यवहार होतोय, हे लक्षात घ्या.

तक्रार कुठे करायची?

कायदेशीर कारवाईपूर्वी सोसायटीच्या व्यवस्थापन समितीकडे लेखी तक्रार करावी. मेंटेनन्स खर्चाचे तपशील, बिलांची प्रत, बँक स्टेटमेंट आणि वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) मागण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार असतो. सोसायटीने माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास तक्रार दाखल करावी. जर घोटाळ्याची रक्कम मोठी असेल आणि फसवणूक, विश्वासघात किंवा बनावट कागदपत्रांचा संशय असेल, तर थेट महाराष्ट्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येतो.

सिव्हिल कोर्ट आणि ग्राहक मंच

सोसायटीच्या कारभारामुळे सदस्यांना आर्थिक नुकसान झाले असेल तर दिवाणी न्यायालयात (सिव्हिल कोर्ट) दावा दाखल करता येतो. तसेच मेंटेनन्स सेवा योग्य न मिळाल्याने त्रास झाला असल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक मंचातही तक्रार करता येते. अनेक न्यायनिर्णयांमध्ये हाऊसिंग सोसायटीला “सेवा पुरवठादार” मानण्यात आले आहे.

याशिवाय जर इमारत पूर्णपणे हस्तांतरित झालेली नसेल आणि बिल्डर किंवा डेव्हलपर सहभागी असेल, तर महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महाRERA) कडेही तक्रार दाखल करता येते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, कुठेही तक्रार करताना मेंटेनन्स पावत्या, बँक स्टेटमेंट, ऑडिट रिपोर्ट, मीटिंगचे मिनिट्स आणि पत्रव्यवहार यांची प्रत जपून ठेवा. हे पुरावेच कायदेशीर लढाईत महत्त्वाचे ठरत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

Palghar Crime: जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT