Home loan Saam tv
बिझनेस

Housing Loan Subsidy Scheme : घरखरेदी करणे होणार सोपे! होम लोनवर मिळणार सबसिडी, केंद्र सरकारची नवी योजना

Central Government Home Loan Scheme : घरखरेदी करणाऱ्याचे लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकार लवकरच ६० हजार कोटी रुपयांची गृहकर्ज अनुदान योजना आणणार आहे.

कोमल दामुद्रे

Home Loan :

शहरातील अनेक भागात घर खरेदी करताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येतात. अशातच वाढती महागाई, पैशांचा अभाव यामुळे घर खरेदी करताना गृहकर्जाशिवाय आपल्याकडे कोणतेच पर्याय नसतात.

अशातच घरखरेदी करणाऱ्याचे लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकार लवकरच ६० हजार कोटी रुपयांची गृहकर्ज अनुदान योजना आणणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही योजना येत्या काही महिन्यांत सुरु होऊ शकते.

यामध्ये ९ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वार्षिक ३-६.५ टक्के दराने दिले जाऊ शकते. २० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.

1. प्रधानमंत्री आवास योजनेपेक्षा ही योजना वेगळी

सध्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेपेक्षा ही योजना शहरीभागासाठी वेगळी असेल. ज्याअंतर्गत १.१८ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे. दारिद्रयरेषेखाली असणारे किंवा झोपडपट्टीत राहाणाऱ्या कुटुंबांना घर देण्यासाठी २२ जून २०१५ रोजी आवास योजना सुरु करण्यात आली होती.

2. रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा

तज्ञांच्या मते, या योजनेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागतील, ज्यामुळे रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. घर खरेदीदार आणि रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्राला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

3. २५ लाख लोकांना होणार लाभ

२०२८ पर्यंत शासनाकडून मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जातील. या योजनेला अंतिम स्वरुप देण्यात आले असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. याचा फायदा (Benefits) शहरी भागातील २५ लाख लोकांना होईल. ही योजना पूर्णपणे घरांच्या मागणीवर अवलंबून असेल.

4. पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टला भाषणात म्हटले

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले होते की, शहरांमधील घर खरेदीदारांसाठी गृहकर्जाची योजना सप्टेंबरमध्ये सांगण्यात येईल. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शहरातील झोपडपट्ट्या, चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये भाड्याने राहणारी कुटुंबे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे बँकेतून कर्ज घेतल्यास त्यावर लाखो रुपयांची सवलत देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT