Home Loan cheaper saam tv
बिझनेस

Home Loan : गुड न्यूज मिळणार! गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त, EMI घटणार

RBI Repo Rate : घर आणि वाहन घेण्याचा विचार करत असाल तर, लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून आगामी काळात रेपो रेटमध्ये ०.५० ते ०.७५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

Nandkumar Joshi

सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. आगामी काळात स्वतःचं घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. रिझर्व्ह बँकेकडून दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली गेली आहे. येणाऱ्या काळातही रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वेळी आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर अनेक सरकारी बँकांनी कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात केली होती. त्यामुळे अनेक बँकांच्या गृहकर्जावरील व्याजदर ८ टक्क्यांहून कमी झाले आहे.

मागील चार वर्षांत पहिल्यांदाच कर्जावरील व्याजदर आठ टक्क्यांहून कमी झाले आहे. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या जूनपासून दिवाळीपर्यंत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ०.५० टक्के ते ०.७५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल अशी अपेक्षा बँकिंग क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच ४ ते ६ जून या कालावधीत आरबीआयची पतधोरण आढावा बैठक आहे. त्यानंतर ५ ते ७ ऑगस्ट किंवा २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत आरबीआयची आढावा बैठक आहे. त्यामुळे आगामी काळात रेपो रेटमध्ये मोठी कपात केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

होम लोन स्वस्त होणार

रेपो रेटमध्ये कपात झाल्यास गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होतील. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांना कर्जावरील व्याजदरांत कपात करावी लागते. त्यामुळे सर्व गृह आणि वाहन कर्जे स्वस्त झाली आहेत. आगामी काळात आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यास घर किंवा वाहन कर्जे घेणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सद्यस्थिती बघता व्याजदर कपातीसाठी सर्व घटक अनुकूल आहेत. मान्सून साधारण राहण्याचा अंदाज आहे. जीडीपी वृद्धी स्थिर आहे. महागाई नियंत्रणात आहे. तसेच किरकोळ महागाई जुलै २०१९ नंतर निचांकी स्तरावर आहे. या सगळ्याचा सारासार विचार करता आगामी काळात रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते. त्यामुळे कर्जे स्वस्त होऊ शकतात असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

Maharashtra Live News Update: पुण्यातील शेकोटी बंदी असताना अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, सर्व उमेदवार ठरणार अपात्र?

SCROLL FOR NEXT