Ram Mandir News Saam Digital
बिझनेस

Holy Ayodhya App: अयोध्येत रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी स्वस्तात रूम हवीय, तर मग 'हे' सरकारी अॅप करणार तुमची मदत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Find Rooms Near Ram Mandir

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) अभिषेक कार्यक्रम होणार आहे. यावेळी लोकांच्या नजरा हा कार्यक्रम पाहण्यावरच खिळल्या आहेत. ट्रस्टने या सोहळ्यासाठी 6 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रणं पाठवली आहेत. प्रत्येकाला हा सोहळा 'याची देहि, याची डोळा' पाहायचा आहे. त्यासाठी सर्वजण अयोध्येत गर्दी करत आहे. (latest ram mandir update)

अयोध्येतील हॉटेल्स या गर्दीमुळे फुल झाले आहेत. तिथे निवासासाठी रूम मिळणं हे मोठं जिकरीचं काम झालं आहे. तिथे जावून राहण्याची सोय होत नसल्यामुळे अनेकजण आपला प्लॅन रद्द करत आहेत. पण अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला तुमचा प्लान कॅन्सल करायची गरज नाहीये. अगदी सहजरित्या तुम्ही स्वतःसाठी खोली (room in Ayodhya) बुक करू शकता. अयोध्या अॅप यासाठी आपल्याला मदत करता येणार आहे. घरात बसून आपण याद्वारे रूम बुक करू शकतो. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

होली अयोध्या अॅप

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येला भेट देणाऱ्यांसाठी हे अॅप (Holy Ayodhya App) लाँच केलं आहे. त्याला ‘होली अयोध्या अॅप’ असं नाव देण्यात आलं आहे. अॅपच्या मदतीने तुम्ही घरी बसून अयोध्येत हॉटेल किंवा होम स्टे सहज बुक करू शकता. अयोध्या विकास प्राधिकरण (ADA) आणि उत्तर प्रदेश पर्यटन मंडळाने येथे भाविकांच्या मुक्कामासाठी संयुक्तपणे अयोध्या अॅप लाँच केलं आहे.

होम स्टे पेइंग गेस्ट स्कीम

होम स्टे पेइंग गेस्ट स्कीममध्ये (PG in Ayodhya) नावनोंदणी करण्यासाठी, मालकाला त्याच्या खोलीचे फोटो आणि व्हिडिओ, त्याचे प्रमाणपत्र, आधार, पॅन कार्ड, वीज बिलाची फोटो कॉपी आणि अर्ज करणाऱ्या मालकाचे दोन फोटो द्यावे लागणार आहेत. उत्तर प्रदेश सरकार हॉटेल्ससह सर्वसामान्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. यामध्ये 1500 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंतच्या किमतीत रिकामी घरे किंवा खोल्या उपलब्ध होतील. त्यासाठी घरमालकाला महापालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे.

'असं' करा बुकिंग

सर्वप्रथम Google Play Store वरून “Holi Ayodhya” अॅप डाउनलोड करा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा. हॉटेल आणि होम स्टे पर्याय निवडा. या अॅपमध्ये 500 हून अधिक हॉटेल्स आणि होम स्टेची यादी उपलब्ध असेल. तुमच्या बजेट आणि सुविधांनुसार तुम्ही स्वतःसाठी हॉटेल शोधू शकता. शेवटी तुम्ही पेमेंट करू शकता. बुकिंग केल्यानंतर तुम्हाला अॅपवर बुकिंग कन्फर्मेशन मिळेल.

या अॅपची खास गोष्ट म्हणजे हे उत्तर प्रदेश सरकारच्या देखरेखीखाली आहे. येथे तुम्हाला 1000 रुपयांपासून 3500 रुपयांपर्यंत रूम मिळतील. यामध्ये (Holy Ayodhya App) तुम्ही तुमच्या बजेटनुसार हॉटेल देखील निवडू शकता. तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचे बुकिंग रद्द करायचे असल्यास, तुम्ही 24 तास अगोदर रद्द करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला परतावा मिळणार नाही. तसेच, घरी राहण्याची वेळ दुपारी 2 वाजता आणि हॉटेलमध्ये राहण्याची वेळ सकाळी 11 वाजता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT