Nokia Phone ANI
बिझनेस

Nokia कंपनीचा मोठा निर्णय; नोकियाचे फोन बाजारातून अन् लोकांपासून होणार Disconnect

Bharat Jadhav

Hmd Global Drops Nokia Branding :

Nokia चे स्मार्टफोन आणि त्याचे फीचर फोन बनवणारी एचएमडी ग्लोबल HMD Global ने एक मोठी घोषणा केलीय. एचएमडी ग्लोबल आता ओरिजनल ब्रँड म्हणजेच एचएमडी ब्राँडिंग असलेले स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी गेल्या काही दिवसापासून वारंवार डिव्हाइसची झलक दाखवत आहे. तर एचएमडीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवरून नोकिया ब्रँडला काढून टाकले आहे.(Latest News)

फोन निर्माती कंपनी एचएमडी लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असून हे फोन्स आता एचएमडीच्या ब्रँडच्या नावाने बाजारात येतील. हे फोन्स लवकरच मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाऊंट आता Nokia.com नाही तर HMD.com नावाने असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


परत एकदा नोकिया कंपनीने बंद होणार आहे का असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे. कारण याआधी मायक्रोसॉफ्टनेही नोकियाचे फोन्स विकले आहेत. परंतु काही दिवसानंतर कंपनीने नोकिया ब्रँडचे हक्क HMD ग्लोबलला विकले. परंतु आजच्या घोषणेमुळे ग्राहकांना कंपनीविषयी प्रश्न पडलाय. वाचक मित्रांनो, कंपनीचे फोन्स बाजारात विक्रीसाठी असणार आहेत. तसेच कंपनी नवीन फोन्स बनवत राहणार आहे. यासह कंपनी नवीन ब्रँडसह भागीदारी करत नवीन डिव्हाइस लॉन्च करणार आहे. आता कंपनीची नवी वेबसाइट hmd.com असून त्यात नोकियाचे फोन्स देखील पाहण्यास मिळतील.

कंपनीची काय आहे प्लानिंग

ओरिजनल एचएमडी ब्रँडसहदेखील काम करेल. आम्ही नोकिया स्मार्टफोन आणि फीचर निर्माते आहोत. परंतु आम्ही आमच्या सर्व नवीन भागीदारांमधील मूळ HMD डिव्हाइसेस आणि फोन्ससह आणखी काही उपकरणे बाजारात आणणार असल्याचं कंपनीने सांगितले आहे. कंपनीने एक टीझर देखील जारी केला आहे, यात कंपनीने स्वत:ला Human Mobile Devices म्हटलंय.

एचएमडी ग्लोबल गेल्या सात वर्षांपासून नोकिया ब्रँडेड स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्सची निर्मिती करत आहे. कंपनीने नोकिया ब्रँड 2016 मध्ये मायक्रोसॉफ्टकडून खरेदी केला होता. कंपनीने १० वर्षांसाठी नोकिया ब्रँडचे हक्क विकले होते. एचएमडी ग्लोबलच्या पहिल्या स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती नाही, पण कंपनीने त्याचा टीझर रिलीज केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT