हिरो मोटारने भारतीय बाजारात Hero HF Deluxe Hybrid लाँन्च केली.
ही बाईक एका लिटरला ७५ किमी मायलेज देते.
फक्त ९ हजार डाउन पेमेंटवर बाईक घरी नेता येते.
तुम्ही व्यवसायिक आहात, तुम्हाला तु्मच्या कामासाठी एका गावावरून दुसऱ्या गावी जावं लागतं? तर मग हिरो मोटार कंपनीने तुमच्यासाठी शानदार बाईक बनवलीय. ही बाईक कमी इंधनातही सूपर मायलेज देते. या बाईकचं नाव आहे, Hero HF Deluxe Hybrid. ही नवीन बाईक तुम्हाला ७५ किमी प्रति लिटरचा प्रभावी मायलेज देईल.
Hero HF Deluxe Hybrid New बाईकला सुंदर ग्राफिक्स बनवण्यात आले आहे. ही बाईक हायब्रिड बाईक असूनही तिचा लूक चांगला राहण्यास आणि अद्भुत ग्राफिक्स करण्यात आले आहे. या बाईकला नवीन ग्राफिक्स आणि आकर्षक रंगांसह स्टायलिश अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स देण्यात आलेत. बाईक अजून जास्त आकर्षक होण्यासाठी कंपनीने या बाईकला एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट आणि डीआरएल देण्यात आले आहेत.
कंपनीने या बाईकमध्ये एंट्री लेव्हल सेगमेंट फीचर्स जोडले आहेत. यात डिजिटल-अॅनालॉग कन्सोल, लो फ्युएल इंडिकेटर, पास स्विच, इंजिन किल स्विच आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ सारखी सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय बाईकमध्ये हिरोची i3S (आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम) देखील समाविष्ट आहे. जी सिग्नलवर थांबल्यावर इंजिन बंद करते आणि क्लच दाबताच इंजिन सुरू करते. यामुळे पेट्रोलची बचत होते आणि बाईक अधिक मायलेज देते.
ही बाईक अगदी कमी बजेटमध्येही सहज खरेदी करू शकता. तस तर या बाईकची शोरूम किंमत ७३,५५० रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर त्यासाठी फायनान्स पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. यातून तु्म्ही फक्त ९,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही बाईक घरी आणू शकता. यानंतर तुम्हाला ९.७% व्याजदराने ३ वर्षांसाठी सुमारे २,४८५ रुपये मासिक EMI भरावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.