GST Reforms Saam Tv
बिझनेस

GST Reforms: विम्यावरील जीएसटी रद्द, प्रिमियम होणार स्वस्त, तुमचे पैसे किती वाचणार?

GST Reforms Health And Life Insurance Get Cheaper: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये हेल्थ आणि लाइफ इन्श्युरन्सवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे.

Siddhi Hande

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

हेल्थ आणि लाइफ इन्श्युरन्सवर जीएसटी नाही

प्रिमियम होणार कमी

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत हेल्थ आणि लाइफ इन्श्युरन्स प्रीमियमबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता हेल्थ आणि लाइफ इन्श्युरन्सवर कोणताही प्रकारचा जीएसटी लागणार नाहीये. ही सूट २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.

हेल्थ आणि टर्म इन्श्युरन्स होणार स्वस्त (Health And Life Insurance Get Cheaper)

सध्या हेल्थ आणि टर्म इन्श्युरन्सवर १८ टक्के जीएसटी लागू होतो. यामध्ये सूट दिल्यानंतर प्रिमियम १५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतो. दरम्यान, या निर्णयामुळे सरकारचे आर्थिक नुकसान होणार आहे. परंतु हा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायद्याचा आहे.

विमा कंपन्यांवर परिणाम

HSBC च्या रिपोर्टनुसार, प्रिमियम कमी झाल्याने थेट विम्याच्या मागणीत वाढ होईल. परंतु कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. ३ ते ६ टक्क्यांनी फरक पडू शकतो. जुन्या रिन्यूअलला रीप्राइज करण्यासाठी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागतो. याचसोबत खर्चाचे प्रमाण आणि इनपुट टॅक्स क्रेडिट सवलतीचा फायदा ग्राहकांना किती मिळणार आहे, हे समजणार आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल (GST Tax Slab Reforms)

जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत कर रचनेत बदल करण्यात आले आहे. यामध्ये ५ टक्के आणि १८ टक्के स्लॅब बदलण्यास मान्यता दिली. त्याचवेळी, लक्झरी वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ यावर ४० टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. तर अनेक वस्तूंच्या दरात कपात झाली आहे. जीवनावश्यक वस्तू ५ टक्के स्लॅबमध्ये ठेवल्या आहेत. तर बहूतेक वस्तू १८ टक्के कर स्लॅबमध्ये असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT