
गणेशोत्सवात सरकारने मोठी घोषणा केली आहे. जीएसची टॅक्स स्लॅबममध्ये बदल करण्यात आले आहेत. आता १२ आणि २८ टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. काल आणि आज जीएसटी कौन्सिलची ५६वी बैठक पार पडत आहे. या बैठकीत दोन टॅक्स स्लॅब रद्द करुन यातील प्रोडक्ट्स इतर टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
याआधी पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, दिवाळीमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला जाईल. मात्र, त्याआधीच मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळाली आहे.
निर्मला सितारामन यांनी काय सांगितलं? (Nirmala Sitaraman Annoucement Of GST Reforms)
निर्मला सितारामन यांनी सांगितले की, आता फक्त ५ आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असणार आहे. त्यामुळे १२ आणि २८ टक्के स्लॅबमधील काही गोष्टींचा ५ आणि १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे काही गोष्टींच्या किंमती कमी झाल्यात तर काही गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत.दरम्यान, यामध्ये काही गोष्टींवर जीएसटी काढून टाकण्यात आला आहे.
या वस्तूंवर जीएसटी नाही (No GST on These Products)
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काही गोष्टींवर शून्य टक्के जीएसटी लावण्याची घोषणा केली आहे. काही जीवनावश्यक वस्तूंना शून्य टक्के स्लॅबमध्ये सहभागी केले आहे.यामध्ये दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा या सर्व गोष्टींना शून्य टक्के स्लॅबमध्ये सहभागी केले आहे. या गोष्टींवर कोणताही टॅक्स लागणार नाही. याचसोबत इंडिविड्युअल इन्श्युरन्स पॉलिसीवरील जीएसटी शून्य टक्के करण्यात आला आहे. याचसोबत शिक्षणासंबंधित सामान म्हणजे कटर, रबर नोटबूक या वस्तूदेखील टॅक्स फ्री झाल्या आहेत. या गोष्टींवर १२ टक्के स्लॅब लागू व्हायचा. याचसोबत ३३ औषधांवरील टॅक्स रद्द करण्यात आल्या आहे.
अनेक अन्नपदार्थांवरील टॅक्स रद्द करण्यात आला आहे. याचसोबत इन्श्युरन्सवरील जीएसटी रद्द केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील कर रद्द केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार नाहीये. सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.