GST Reforms Saam Tv
बिझनेस

GST Reforms : सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, २२ सप्टेंबरनंतर जुन्या वस्तूच्या विक्रीवर टाकली अट; वाचा सविस्तर

GST 2.0 Notification: जीएसटीचे नवीन टॅक्स स्लॅब २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. आता जीएसटी स्लॅबममध्ये बदल केल्याने अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहे.

Siddhi Hande

GST कौन्सिलची बैठक

जीएसटीमुळे अनेक गोष्टींच्या किंमती होणार कमी

जुन्या वस्तूंवरदेखील लागणार नवीन दर

जीएसटी कौन्सिलची काही दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता जीएसटीमधून दोन टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या टॅक्स स्लॅबमधील अनेक गोष्टी दुसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यानंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता ज्या कंपन्यांकडे जुना काही माल आहे तर त्याच्यावर नवीन दर लागू होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, कंपन्या जुन्या मालावरदेखील नवीन रेट लावू शकते.कंपन्या या सामानावर ऑनलाइन प्रिंट किंवा स्टिकर्स लावून ती वस्तू विकू शकतात.

जुन्या वस्तूंवर नवीन स्टीकर

जीएसटी स्लॅब हे २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहे. दरम्यान, आता जर तुमच्याकडे काही गोष्टींचा स्टॉक असेल तर त्यावर २२ सप्टेंबरनंतर नवीन दर लागू करावे लागणार आहेत. तुम्हाला २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटीप्रमाणे किंमत ठरवावी लागणार आहे आणि त्याप्रमाणे नवीन स्टिकर लावावा लागणार आहे.

सरकारने कंपन्यांना याबाबत माहिती दिली आहे. सरकारने सांगितले की, नवीन किंमती लावण्यासोबत याची माहिती ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. यासाठी जाहिराती किंवा इतर अनेक माध्यमातून माहिती द्या.जेणेकरुन हे नवीन दर राज्यातील दुकानदार, ग्राक आणि संबंधित विभागांना मिळणार आहे.

जीएसटीचे नवीन दर हे २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. दरम्यान, अनेक कंपन्यांमध्ये अजूनही माल शिल्लक आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हा माल विकण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात कंपन्याना जास्त फटका बसणार नाही.

अधिसूचनेत काय म्हटलंय?

ग्राहक व्यव्हार विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात सरकारने म्हटलंय की, कंपन्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत किंवा जुन्या वस्तूंचा स्टॉक संपेपर्यंत एमआरपी किंमत जाहीर करु शकतात. त्या वस्तूंव एमआरपीबद्द स्टिकर्स लावणे किंवा प्रिय करणे गरजेचे आहे.

अधिसूचनेनूसार, जीएसटी बदलामुळे जुन्या आणि नवीन किंमतीतील फरक दर्शवते. दरम्यान, नवीन किंमत लावताना त्यावर जुनी किंमत नसावी, असंही सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्यासोबत उठणं बसणं सुरुच राहणार - राज ठाकरे

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT