GST Council reduces slabs to 3; shoes and clothes under ₹2500 to cost less from September 22. saam tv
बिझनेस

GST Reform: आता GST मध्ये फक्त 2 स्लॅब, नवीन दर 22 सप्टेंबरपासून होणार लागू

GST Reform: जीएसटी कौन्सिलच्या ५४ व्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, आता जीएसटीमध्ये फक्त ३ स्लॅब असतील. १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब काढून टाकण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

GST Council news: जीएसटी कौन्सिलमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आता जीएसटीचे फक्त ३ दर लागू होतील असा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी एक ५%, दुसरा १८% आणि एक विशेष स्लॅब असणार आहे. देशात शूज आणि कपडे देखील २५०० रुपयांपर्यंत स्वस्त होतील. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हे १२ टक्के स्लॅबमधून काढून ५ टक्के स्लॅबमध्ये आणण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी याची घोषणा करतील.

देशातील नागरिकांचे लक्ष आज होत असलेल्या जीएसटी परिषदेकडे लक्ष लागले आहे. जीएसटी कमी करत महागाईत होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७५ वस्तूंवरील कमी करण्यात येणार आहे. जीएसटी कौन्सिलने २५०० रुपयांपर्यंतच्या पादत्राणे आणि कपड्यांवरील जीएसटी दर कमी केलाय. या वस्तूंना आता ५ टक्के कर लागेल, असे सांगितले जात आहे.

५६ व्या जीएसटी कौन्सिलने ५ टक्के स्लॅबमधील पादत्राणे आणि कपड्यांसाठीची मर्यादा १,००० रुपयांवरून २,५०० रुपये प्रति नग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे शॉपिंग करणाऱ्यांसह ही उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनाही मोठा दिलासा मिळेल. दरम्यान याची अधिकृत घोषणा उद्या गुरुवारी केली जाणार आहे. स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार आहेत.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सरकार सुमारे १७५ वस्तूंवरील जीएसटीमध्ये किमान १० टक्के कपात करणार असल्याचे सांगितलं जात आहे. काही सुधारणा आहेत ज्यांची सामान्य माणसाला अजून वाट पहावी लागेल. सध्या, ५%, १२%, १८% आणि २८% या चार स्लॅबपैकी फक्त दोन स्लॅब प्रस्तावित आहेत. आवश्यक वस्तूंसाठी ५% आणि अनावश्यक वस्तूंसाठी १८%. याव्यतिरिक्त, तंबाखू आणि ५० लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या कारसारख्या तथाकथित 'पापाच्या वस्तू'साठी ४०% चा अतिरिक्त स्लॅब प्रस्तावित केला जाण्याची शक्यता आहे.

अनेक वस्तूं स्वस्त होतील. १२-२८ टक्के स्लॅबला ५ आणि१८ टक्क्याच्या स्लॅबमध्ये दाखल केले जाणार आहे. जीएसटी दरांमध्ये बदल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी-वाढवण्यात आलेत. काही वस्तू अशा आहेत ज्यांचे दर जीएसटी लागू झाल्यापासून बदललेले नाहीत.

या गोष्टी सामान्य जीवनाशी संबंधित आहेत. यात चॉकलेट, बिस्किटे, पेस्ट्री, मिठाई आणि आईस्क्रीम सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचे जीएसटी दर यावेळी कमी केले जाऊ शकतात. सामान्य लोकांसाठी त्या किती स्वस्त होतील. प्रस्तावानुसार लोणी, फळांचे रस आणि सुकामेवा यासारख्या १२ टक्के श्रेणीतील ९९ टक्के वस्तू ५ टक्के करदराखाली येणार आहेत. यासह तूप, सुकामेवा, पिण्याचे पाणी (२० लिटर), नमकीन, काही पादत्राणे आणि कपडे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तू १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Rate Today: धनत्रयोदशीला चांदीच्या दरात कमालीची घट! तब्बल १३००० रुपयांनी स्वस्त

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Yawning Heart Attack: वारंवार जांभई येणं हार्ट अटॅकचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Accident News : भीषण अपघात! प्रवासी बस उलटून २ अल्पवयीन मुलींचा मृत्यू तर २८ जण गंभीर जखमी

Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT