Major Relief for Two-Wheeler Buyers Saam
बिझनेस

जीएसटीत मोठा बदल! बाईक आणि स्कूटर खरेदीदारांसाठी खुशखबर; दुचाकी स्वस्त होणार?

Major Relief for Two-Wheeler Buyers: केंद्र सरकारनं जीएसटी स्लॅब ४ वरून २ वर आणले. ३५० सीसीपेक्षा कमी बाईकवर १८% जीएसटी लागू होणार. होंडा अक्टिव्हा, बजाज पल्सर, स्प्लेंडर सारख्या बाईक स्वस्त होणार.

Bhagyashree Kamble

  • केंद्र सरकारनं जीएसटी स्लॅब ४ वरून २ वर आणले.

  • ३५० सीसीपेक्षा कमी बाईकवर १८% जीएसटी लागू होणार.

  • होंडा अक्टिव्हा, बजाज पल्सर, स्प्लेंडर सारख्या बाईक स्वस्त होणार.

  • रॉयल एनफिल्डसारख्या ४५० सीसीपेक्षा जास्त बाईकवर ४०% जीएसटी लागू.

केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा जाहीर केली आहे. जीएसटी परिषदेच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, कराचे चार स्लॅब कमी करून फक्त दोन स्लॅब ठेवण्यात आले आहेत. १२ आणि २८ टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले असून, ५ आणि १८ टक्के हे दोन स्लॅब सुरू राहणार आहेत.

या निर्णयाचा थेट परिणाम गाड्यांच्या किंमतींवर होणार आहे. विशेषतः दुचाकी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर आपण पुढील काळात बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

BIke GST

जीएसटीचे नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांवर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. याआधी हा दर २८% होता. त्यामुळे होंडा अक्टिव्हा, बजाज पल्सर, स्प्लेंडर यांसारख्या लोकप्रिय बाईक्स स्वस्त होणार आहेत.

BIke GST

तसेच ४५० सीसी आणि ६५० सीसीहून जास्त मोटारसायकलींवर ४० टक्के कर आकारला जाईल. रॉयल एनफिल्डसारख्या क्रूजर बाईकवर ४० टक्के जीएसटी लागू होणार आहे. या बाईक्स महाग होणार आहेत.

BIke GST

बाईक्सच्या ऑन रोड किंमत किती?

बाईक्सच्या एक्स शोरूममध्ये किंमतीव्यतिरिक्त ६,६५४ रूपये आरटीओ शुल्क, ६,६८५ रूपये इंश्योरंस, प्रीमियम आणि जवळपास ९५० रूपये दुसरा चार्ज लावण्यात येतो. या सगळ्या किंमती जोडल्यानंतर दिल्लीत स्प्लेंडर प्लसची किंमत जवळपास ९३,७१५ रूपये होते. टॅक्स कमी केल्याचा पूर्णपणे लागू झाला तर, आधीपेक्षा या बाईक स्वस्त होतील.

BIke GST

३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या लोकप्रिय स्कूटर्स

BIke GST

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT