5G Smartphone Under Rs 15000: Saam Tv
बिझनेस

Samsung च्या तीन 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

5G Smartphone Under Rs 15000: सॅमसंग हा भारतात सर्वाधिक विकला जाणारा मोबाईल फोन आहे. यातच जर तुम्ही या नवीन वर्षात कमी किंमतीत चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Satish Kengar

5G Smartphone Under Rs 15000:

सॅमसंग हा भारतात सर्वाधिक विकला जाणारा मोबाईल फोन आहे. यातच जर तुम्ही या नवीन वर्षात कमी किंमतीत चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आज आम्ही तुम्हाला सॅमसंगच्या काही अशा 5G फोन बद्दल माहिती सांगणार आहोत, जे जबरदस्त प्रोसेसर, स्टोरेज आणि चांगल्या कॅमेरा सह येतात. हे 5G स्मार्टफोन तुम्ही 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samsung Galaxy A14 5G

सॅमसंगने सादर केलेला हा परवडणारा 5G फोन 6.6-इंच फुल HD+ स्क्रीनसह येतो. यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. मोठ्या डिस्काउंटनंतर हा फोन सध्या 14,499 रुपयांना विकला जात आहे. (Latest Marathi News)

Samsung Galaxy M14 5G

सॅमसंगचा हा 5G फोन 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 6000mAh मोठी बॅटरी, 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसर, 13MP फ्रंट कॅमेरा आणि 6.6-इंच FHD+ LCD डिस्प्लेसह येतो. बंपर डिस्काउंटनंतर तुम्ही हा सॅमसंग फोन फ्लिपकार्टवरून 13,650 रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F14 5G

6000mAh ची मोठी बॅटरी असलेला सॅमसंगचा हा 5G फोन फ्लिपकार्टवर 14,490 रुपयांना विकला जात आहे. या फोनवरही मोठी सूट दिली जात आहे. फोन ऑक्टा-कोर Exynos 1330 प्रोसेसर सपोर्टसह येतो. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर सपोर्ट करतो. तसेच फोनच्या फ्रंटमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT