Gratuity Rules Saam tv
बिझनेस

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Gratuity New Rules: ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. आता तुम्हाला १ वर्ष सर्व्हिस केल्यानंतर ग्रॅच्युटी मिळणार आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता १ वर्षात मिळणार ग्रॅच्युटी

आधी ५ वर्ष काम केल्यानंतर मिळायची ग्रॅच्युटी

तुमच्या पगारानुसार तुम्हाला किती ग्रॅच्युटी मिळणार?

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रॅच्युटीच्या नियमां मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला नवीन कामगार कायद्याअंतर्गत १ वर्षाच्या सर्व्हिसमध्येही ग्रॅच्युटी मिळणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याआधी तुम्ही जर कोणत्याही संस्थेत ५ वर्षांपर्यंत नोकरी केली तर तुम्हाला ग्रॅच्युटीचा लाभ मिळत होता. मात्र, आता सरकारने या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीसाठी ५ वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. तुम्हाला १ वर्ष काम केल्यानंतर ग्रॅच्युटीचा फायदा मिळणार आहे.

ग्रॅच्युटी ही कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदत असते. यामध्ये कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली किंवा रिटायर झाल्यावर त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम दिली जाते. देशातील सर्व फॅक्टरी, ऑइल फिल्ड, रेल्वे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होतो.

१. ग्रॅच्युटी नक्की आहे तरी काय? (What is Gratuity)

ग्रॅच्युटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिली जाते. सलग कंपनी काम केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना एक प्रकारची भेट दिली जाते.

२. प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळते?

सर्व फॅक्टरी, कारखाणे, खाणी, तेल क्षेत्रे, बंदरे आणि रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळते. याचसोबत १० पेक्षा जास्त लोक दुकानात काम करणाऱ्यांनाही हा नियम लागू होतो.

३. ग्रॅच्युटीमध्ये नोटीस पीरियड मोजला जातो का?

नियमांनुसार, नोटीस पीरियड हा सलग सेवेत मोजला जातो. त्यामुळे ग्रॅच्युटी मिळवताना नोटीस कालावधीदेखील मोजला जातो.

४. ग्रॅच्युटी कशी मोजायची? (How To Calculate Gratuity)

ग्रॅच्युइटीसाठी तुमचा (शेवटचा पगार)x(१५/२६) x (कंपनीत काम केलेल्या वर्षांची संख्या) हा फॉर्म्युला वापरला जातो.

जर तुम्ही कंपनीत ५ वर्षे काम केले असेल आणि तुमचा शेवटचा पगार ५०,००० रुपये असेल तर ५०,००० x(१५/२६) x ५= १४४२३० असा असेल.

५. नवीन नियमानुसार १, २, ३ वर्षे ग्रॅच्युटी दिली जाईल का?

जर एखाद्याने एका कंपनीत १ वर्ष काम केले. नवीन कामगार संहितेमध्ये मूळ पगार हा एकूण पगाराच्या ५० टक्के असायला हवा. जर पगार ५०,००० रुपये असेल आणि त्याने एक वर्ष काम केले. त्याचा मूळ पगार २५,००० असेल तर त्याला ग्रॅच्युटी मिळणार आहे.

पहिल्या वर्षी- (२५,००० × १५ × १) ÷ २६ = १४,४२३ रुपये

दुसऱ्या वर्षी-(२५,००० × १५ × २) ÷ २६ = २८,८४६

तिसऱ्या वर्षी- (२५,००० × १५ × ३) ÷ २६ = ४३,२६९ रुपये 

चौथ्या वर्षी (२५,००० × १५ × ४) ÷ २६ = ५७,६९२ रुपये 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT