Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, ९ ते ५ नोकरी करत पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS नेहा बॅनर्जी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Neha Banerjee: आयएएस नेहा बॅनर्जी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी नोकरी करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकाची काही न काही स्वप्न असतात. परंतु कधीतरी परिस्थिती किंवा घरच्यांच्या इच्छेसाठी आपण ही स्वप्नं मागे सोडतो. परंतु एवढे सर्व असूनही आयुष्यात एकदा तरी आपली स्वप्न पूर्ण करण्याची आपल्याला मिळते. या संधीच अनेकजण सोनं करतात. असंच नेहा बॅनर्जी (IAS Neha Banarjee) यांनीदेखील केलं. त्यांना ९ ते ५ नोकरीसोबत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

नेहा यांनी १२वीनंतर आयआयटी खडपूरमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. परंतु त्यांना आयएएस होऊन देशसेवा करायची होती. (Success Story)

नेहा बॅनर्जी यांनी ९ ते ५ फुल टाइम नोकरीसोबत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्या रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करायच्या. त्यानंतर घरी आल्यावर पुन्हा अभ्यास करायच्या. सुट्टीच्या दिवशी त्या मन लावून अभ्यास करायच्या.

नेहा यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी (UPSC)परीक्षा दिली. त्यांनी पहिल्याच अटेंप्टमध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्या पहिल्याच प्रयत्नात २० रँक मिळवून आयएएस ऑफिसर बनल्या. त्यांनी यूट्यूबच्या मदतीने इंटरव्ह्यूची तयारी केली होती. याचसोबत अनेक मॉक टेस्टदेखील दिल्या होत्या.

आयएएस नेहा बॅनर्जी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. त्या सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय असतात. दिवसभर नोकरी (Job)करायची, मिळेल त्या वेळेत स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हा त्यांचा दिनक्रम असायचा. त्यांनी फार कमी वयात यश मिळवलं आहे. त्यांच्या हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT