घरातील प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी मेकॅनिक, प्लंबर किंवा सुतार यांना बोलवावं लागतं. अशा वेळी या छोट्या छोट्या कामांसाठी आपले हजार पंधराशे रुपये (Cheapest Home Services) जातात. त्यामुळे घरातील एखादी वस्तू दुरूस्त करणं, मोठं आव्हान वाटतं. त्यामुळे अनेकदा आपण वस्तू दुरूस्त करण्याची टाळाटाळ करतो. पण, आता असे होणार नाही. या कामांसाठी आपण एका अॅपबद्दल जाणून घेऊ या. (Latest News)
खराब वस्तू स्वस्तात दुरुस्त करण्यात आपल्याला सेवा मित्र अॅप मदत करणार आहे. हे एक सरकारी ॲप आहे. यामुळे स्वस्तात काम करता येते. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घरातील लहान-मोठ्या वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत बचत करता (Sewa Mitra App) येते. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोटरसायकल रिपेअरर, ब्युटीशियन, फोटोग्राफर, सुतार आणि ऑटो मेकॅनिकसह 61 विविध श्रेणीतील सेवा मिळतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'अशा' प्रकारे सेवा मित्र ॲपचा लाभ घ्या
सेवा मित्र ॲपचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे ॲप Google Play Store किंवा Apple App वरून इन्स्टॉल करावं लागेल. येथे तुम्हाला Search Skilled Worker चा पर्याय दाखवला जातो. यामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कामगारांची यादी पाहू शकता आणि त्यांचे दरही तपासू शकता.
यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचे लोकेशन (Govt App) टाका. यानंतर, खालील दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला (मेकॅनिक, सुतार इ.) शोधत आहात ती निवडा. आता सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
अॅप कसं काम करतं?
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, घरातील एसी दुरुस्त करण्यासाठी एखाद्या टेक्निशियनला बोलावलं तर तो 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दुरुस्ती करत नाही. या ॲपवर तुम्हाला फक्त 149 रुपयांच्या किमतीत सेवा दिली जात (Sewa Mitra App Detail) आहे. त्यामुळे आपल्या वस्तू स्वतात दुरूस्त होतात.
ॲपवर दिलेल्या तपशिलानुसार, कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल तरुणांनाही या ॲपवरील डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे रोजगार मिळू शकतो. यासाठी ॲपवर नोंदणी करताना तुम्ही तुमचे कौशल्य निवडू शकता. यासह, जेव्हा आपल्या संबंधित कामगारांची आवश्यकता असेल तेव्हा आपल्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.