भारतातील कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक सुविधेची विशेष काळजी घेते. परंतु ट्रेन उशिराने ठराविक रेल्वे स्थानकावर पोहोचत असेल किंवा रेल्वे रद्द झाली असेल तर प्रवास खूप कंटाळवाणा होत असतो. हा अनुभव प्रत्येकांना आला असेल. यामुळे रेल्वे प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे रेल्वे कुठपर्यंत आली असेल? रेल्वेची माहिती घेण्यासाठी अनेकजण इंटरनेटचा उपयोग करतात. परंतु फोनमध्ये इंटरनेट नसेल तर रेल्वेचे अपडेट घेणं कठीण होत असतं.(Latest News)
दरम्यान एका कंपनीने असे मोबाईल ॲप तयार केले आहे. ज्यातून आपल्याला रेल्वेची माहिती मिळते, तेही इंटरनेटशिवाय. ट्रेनचे लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हेअर इज माय ट्रेन ॲप (Where is my Train App) डाउनलोड करावे लागेल. हे ॲप तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करू शकता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोणत्याही ट्रेनचे रिअल टाइम स्थान, अंदाजे आगमन आणि प्रस्थान वेळ, थांबा माहिती आणि विलंब/रद्दीकरणावरील अपडेट यातून घेत असतो. पीएनआर स्टेटस जाणून घेणार असाल तर यात बुकिंग स्टेटस, सीट कन्फर्मेशन, कोच स्टेटस आणि सह-प्रवासी स्टेटससह पीएनआर नंबरदेखील या ॲपमधून मिळत असते.
तसेच या ॲपमध्ये आयआरटीएसच्या वेबसाइटवरून आपण रेल्वे तिकीट मिळू शकते. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक, चौकशी काउंटर लोकेशन, वेटिंग रूम, रेस्टॉरंट यांसारख्या आगामी स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहितीदेखील या ॲपद्वारे मिळते. तुम्ही हे ॲप घेतले तर ट्रेनची स्थिती किंवा पीएनआर स्थिती जाणून घेण्यासाठी स्टेशनवर लांब रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून तुमची मुक्तता होणार आहे. ट्रेनचे स्थान आणि अपडेट्सची माहिती मिळवून, तुम्ही त्रासमुक्त प्रवास करू शकता.
ॲप (Where is my Train App) ट्रेनची स्थिती आणि रेल्वे वाहतुकीची माहिती देते. त्यामुळे आपण अपडेट राहून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हे ॲप वापरणं सोपे आहे. यासाठी कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज भासत नाही.
Where is my Train ॲप कसं काम करतं
ट्रेनचे थेट लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी या अॅपमध्ये तीन मोड उपलब्ध आहेत. सेल टॉवर पर्याय इंटरनेट कनेक्शनशिवाय कार्य करतो. सेल टॉवर पर्यायासह ॲप ट्रेन ज्या ठिकाणाहून जाते त्या ठिकाणाजवळील मोबाइल टॉवरचे सिग्नल पकडते. ॲपच्या मदतीने जवळच्या टॉवरच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळेल. या मोड व्यतिरिक्त, ॲप इंटरनेट आणि GPS मोडही आपल्याला मिळत असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.