Government Scheme Saam tv
बिझनेस

Government Scheme: या सरकारी योजनेत १५०० ऐवजी मिळणार २५०० रुपये; निधी वाढवला; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Yojana Installment Increases: संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील निधी वाढवण्यात आला आहे. आता दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

सरकारचा मोठा निर्णय

काही योजनांचा निधी वाढवा

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगाना मिळणार २५०० रुपये

१००० रुपयांचा निधी वाढवला

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना राबवली आहे. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मळते. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीत १००० रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांना २५०० रुपये मिळणार आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधा योजनेत १५०० रुपये दिले जातात. आता या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना २५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील दिव्यांग कल्याण संघटना, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभात १ हजार रुपयांनी वाढ केली आहे. काही वर्षांपूर्वी या लाभात ५०० रुपयांची वाढ केली आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेतला आहे. फक्त दिव्यांगांना हा लाभ मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे पावणेदोन लाख लाभार्थी आहेत. त्यातील आठ ते नऊ हजार दिव्यांग लाभार्थी आहेत. त्यामुळे त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ऑक्टोबरपासून नवीन निर्णय लागू

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहे. या निर्णयाची अंबलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे, असं सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून हा वाढीव निधी देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसला खिंडार; २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

Maharashtra Government: गुंठेधारकांसाठी खुशखबर! आता सातबाऱ्यावर नाव लागणार; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT