Scheme  Saam Tv
बिझनेस

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Scheme For Women: महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हे खूप महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हे खूप महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत असते. सरकारच्या अनेक योजनाअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळते. ज्याच्या मदतीने महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. याच योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

स्टँड अप इंडिया योजना (Stand Up India Scheme)

स्टँड अप इंडिया योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेत अनुसुचित जाती आणि जमातीच्या लोकांना व्यवसाय करण्यास आर्थिक मदत केली जाते. यात महिलांना १० लाख ते १ कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचा व्यवसायात ५१ टक्के शेअर असणे आवश्यक आहे.

स्त्री शक्ती योजना

तुम्हाला जर लघु उद्योग सुरु करायचा असेल तर तुम्ही स्त्री शक्ती योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्हाला २५ लाखांचे कर्ज मिळेल. हे कर्ज महिला त्यांच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी वापरु शकतात. यात महिला त्या व्यव्यसायात ५० टक्के पार्टनर असणे गरजेचे आहे. या योजनेत तुम्हाला ५० हजार रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाही. परंतु तुम्ही जर ५० हजारपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज घेणार असाल तर तुम्हाला काहीतरी हमी द्यावी लागेल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Scheme)

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेत महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. तसेच महिला उद्योजकांना व्याजदरात सवलत दिली जाते.

महिला समृद्धी योजना (Mahila Samruddhi Yojana)

महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी १.४० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी आहे. त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT