सरकार नेहमीच नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. या योजनांमध्ये सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाते. अशीच एक योजना म्हणजे ई-श्रम कार्ड. ई- श्रम कार्ड योजनेत असंगठीत क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत केली जाते. यासाठी सरकारीने ई-श्रम पोर्टलदेखील सुरु केले आहे.
असंगठीत क्षेत्रातील कामगारांना रोज वेतन दिले जाते. त्यांना इतर कामगारांसारखी एक ठरावीक रक्कम महिन्याला मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांना भविष्यात आर्थिक मदत करण्यासाठी ही योजबा राबवली गेली आहे. या योजनेचा लाभ कोणत्याही असंगठित क्षेत्रातील व्यक्ती घेऊ शकते. या योजनेअंतर्गत असंगठित क्षेत्रातील कामगारांना ६० वर्षानंतर पेन्शन दिली जाते.
ई- श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना आर्थिकदृष्ट्या मदत करते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना निवृत्तीनंतर दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळते. परंतु यासाठी तुम्हाला ई- श्रम कार्ज बनवून घ्यावे लागेल.
असंगठित क्षेत्रातील कोणाताही कामगार या योजनेअंतर्गत अर्ज करु शकतात. यामध्ये ६० वर्षानंतर पेन्शन, मृत्यू वीमा आणि अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १२ अंकी यूएएन नंबर दिला जातो.
सरकारने २६ ऑगस्ट २०२१ मध्ये ही योजना सुरु केली होती. आतापर्यंत २९.२३ कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे. या योजनेत एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला २ लाख रुपयांची मदत मिळते. तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची मदत मिळते. यासाठी तुम्ही https://eshram.gov.in/ या साइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
या योजनेत अर्ज करण्यासाठी फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट नंबर गरजेचा आहे. या तीन कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही ई-श्रम पोर्टलवर जाऊन अर्ज भरु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.