Dhanlakshmi Yojana Saam Tv
बिझनेस

Dhanlakshmi Yojana: मुलींच्या शिक्षणासाठी सरकार करतंय १ लाख रुपयांची मदत;काय आहे धनलक्ष्मी योजना?

Dhanlakshmi Yojana For Girls Education: मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने योजना राबवली आहे. धनलक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी सरकार १ लाख रुपयांची मदत करते.

Siddhi Hande

सरकार नेहमीच नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवतात. सरकारने मुलींसाठीही अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी या योजना राबवल्या जातात. मुलींच्या शिक्षणासाठी सरकारची अशीच एक योजना म्हणजे धनलक्ष्मी योजना. (Dhanlaksmi Yojana)

धनलक्ष्मी योजना ही केंद्र सरकारने सुरु केली होती. मात्र, काही कारणात्सव ही योजना बंद करण्यात आली आहे. मात्र, छत्तीसगड सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मुली १८ वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना १ लाख रुपयांची मदत केली जाते. हे पैसे मुली आपल्या शिक्षणासाठी खर्च करु शकतात. मुलींना स्वावलंबी आणि स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी ही योजना राबण्यात आली आहे.

सरकारच्या या योजनेत मुलींच्या नावाने नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर मुलींना योजनेअंतर्गत ५००० रुपयांची मदत मिळते. तसेच लसीणकरणासाठी १२५० रुपये दिले जातात. प्राथमिक शिक्षणासाठी ३५०० रुपये दिले जातात. ८वी पर्यंत ३७५० रुपये जातात. याशिवाय १८ वर्षानंतर १ लाख रुपयांची मदत केली जाते.

पात्रता

या योजनेसाठी अर्ज करणारी मुलगी ही छत्तीसगडची रहिवासी असणे गरजेचे आहे.योजनेसाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. जिल्हा कार्यालयात जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT