Amravati News : तहसीलदारांच्या टेबलावर फेकल्या संत्री; नुकसानीमुळे शेतकरी आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसाने तथा वादळी वाऱ्याने फटका बसत आहे
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : सततच्या पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे संत्रा झाडावरून गळून पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून तहसीलदारांना फळगड झालेली संत्री भेट दिली आहे. तर संत्राच्या माळा गळ्यात घालून सरकार विरोधात घोषणाबाजी जोरदार घोणबाजी केली. 

Amravati News
Hingoli crime : चुकीच्या माहितीतून गैरसमज झाल्याने तलाठ्याची हत्या; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसाने तथा वादळी वाऱ्याने फटका बसत आहे. संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जास्त पाऊस (Rain) झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळून पडत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात संत्राच्या माळा घालत सरकारचा निषेध नोंदवला.  

Amravati News
Bhandara News : आश्रम शाळेतील विद्यार्थीनीचा मृत्यू; शाळा व्यवस्थापनाने दिली दोन लाखांची मदत

हेक्टरी ३ लाख मदतीची मागणी 

यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात जात टेबलवर संत्री फेकत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३ लाख रुपये मदत करण्यची मागणी केली. तातडीने संत्रा गळती बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com