Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: लेकीच्या लग्नाची चिंता मिटली! सरकार देतंय १ लाखांची मदत; योजना नक्की आहे तरी काय?

Mukhyamantri Samuhik Vivah Yojana: उत्तर प्रदेश सरकारने मुलींसाठी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींच्या लग्नासाठी १ लाखांची मदत केली जाते.

Siddhi Hande

मुलींच्या जन्मापासूनच तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची चिंता असते. मुलीने लग्न छान थाटामाटात करावे अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु अनेक आर्थिक परिस्थितीमुळे हे जमत नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलीच्या लग्नाचा खर्च उचलू शकत नाही. परंतु आता सरकार मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने खास लेकीच्या लग्नासाठी मुख्यमंत्री सामुदायिक विवाह सोहळा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये दिले जातात. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळा योजना सुरु केली आहे. याअंतर्गत तुम्हाला आधी ५१००० रुपये दिले जायचे. त्यानंतर आता ही रक्कम वाढवून १ लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत मुलीला ६०,००० रुपये दिले जाणार आहेत. २५००० रुपये लग्नासाठी वापरले जाणार आहे. तर १५००० रुपये हे सामूहिक विवाह सोहळ्याच्या उपाययोजनेसाठी वापरले जाणार आहेत.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. तर मुलाचे वय २१ किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला shadianudan.upsdc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला जवळच्या जन सेवा केंद्रात जाऊनदेखील अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक,लग्नाची पत्रिका असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT