Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat Yojana: ५५ कोटी नागरिकांसाठी खूशखबर! 'आयुष्मान भारत'च्या विमा रकमेत मोठी वाढ होणार

Siddhi Hande

केंद्र सरकारच्या नागरिकांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेत जर कोणी आजारी पडले तर त्यांना विमा मिळतो.याच योजनेत आता विम्याचे पैसे वाढवण्याची मागणी केली जात आहे. (Ayushman Bharat Yojana)

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिलांसाठी विम्याची रक्कम १० लाखांहून १५ लाख करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आसा आहे. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवण्याचीही मागणी केली जात आहे.

सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमारे ७.२२ लाख खाटा खाजगी रुग्णालयात आहेत. ही संख्या २०२८-२९ पर्यंत ११.१२ लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम वाढवण्यात आली तर लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. (Ayushman Bharat Yojana Insurance Increase Upto 10 Lakh)

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये वार्षिक विमा संरक्षण दिले जाते. आतापर्यंत ५५ कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. या योजनेत विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. नवीन प्रस्तावानुसार, प्रत्येक कुटुंबाचे विमा संरक्षण १० लाख रुपयांपर्यंतच वाढवले जाईल. तर विशेष आजारांसाठी महिलांना १५ लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते. आयुष्मान भारत योजनेअतंर्गत लाभार्थ्यांची संख्या ५५ कोटींहून १०० कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : भरधाव टिप्परने पाचवीच्या विद्यार्थ्याला चिरडलं, संतप्त नागरिकांना टिप्पर पेटवला

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT