PM Svanidhi Yojana: नवीन व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय हमीशिवाय कर्ज, काय आहे पीएम स्वनिधी योजना?

PM Svanidhi Yojana To Start Business: स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना. या योजनेअंतर्गत सरकार व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय लोन देते.
PM Svanidhi Yojana
PM Svanidhi YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. नागरिकांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारकडून कर्ज दिले जाते. सरकारची अशीच एक योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना.पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करतात.

PM Svanidhi Yojana
SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत सरकार स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी, लोकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते. ही योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे. या लोकांना रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

पीएम स्वनिधी योजना कोरोना काळात सुरु झाली होती. या योजनेअंतर्गत सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना काम पुन्हा सुरु करण्यासाठी कर्ज देते. या योजनेअंतर्गत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फास्ट फूड विक्रेत्यांना स्वतः चे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत मिळते.

केंद्र सरकार पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे कर्ज परतफेड करण्यासाठी जे लोक समर्थ असतील त्यांनाच हे कर्ज दिले जाते. या योजनेत पहिल्यांदा १०,००० रुपये कर्ज दिले जाते. या कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांदा कर्ज दिले जाते.

PM Svanidhi Yojana
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

या योजनेत तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम तीन हप्त्यांमध्ये तुमच्या अकाउंटला जमा केली जाते. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही १ वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.

PM Svanidhi Yojana
Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com